रितेश व जिनिलीया देशमुख यांची जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ते नेहमीच विविध पोस्ट शेअर करून चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रेक्षक या दोघांना महाराष्ट्राचे दादा-वहिनी म्हणून संबोधतात. या जोडप्याला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. या दोघांचे अनेक फोटो जिनिलीया इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. सध्या अभिनेत्रीने शेअर केलेला असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.

रितेश-जिनिलीयाची दोन्ही मुलं फुटबॉल खेळतात. गेल्या काही वर्षांपासून त्यांची दोन्ही मुलं सातत्याने फुटबॉचा सराव करतात. याच मेहनतीचं फळ म्हणून त्यांना कमी वयातच नामांकित फुटबॉल स्पर्धेत सहभागी व्हायची संधी मिळाली. आपल्या मुलांची मॅच पाहण्यासाठी रितेश-जिनिलीया जोडीने स्टेडियममध्ये पोहोचले होते. यावेळी अभिनेता रियान व राहीलला चिअर करत असल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : शरद पोंक्षेंचा मुलगा सिनेसृष्टीत करतोय पदार्पण, पहिल्याच चित्रपटात वडिलांसह काम करण्याबाबत स्नेह पोंक्षे म्हणाला…

रितेशचा शिट्ट्या वाजवतानाचा व्हिडिओ शेअर करत जिनिलीया लिहिते, “मी माझ्या मुलांना नेहमी सांगते प्रेक्षकांमधून ऐकू येणारी सर्वात मोठी शिट्टी तुमच्या बाबाची असेल आणि तो कायम त्याचा शब्द पाळतो. आमची अनुक्रमे ७ आणि ९ वर्षांची मुलं एवढ्या लवकर BarcaIndia कडून खेळतील असं मला खरंच वाटलं नव्हतं.”

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेता झळकला ‘नवरी मिळे हिटलरला’ नव्या मालिकेत, साकारतोय ‘ही’ महत्त्वाची भूमिका

genelia deshmukh
जिनिलीयाची पोस्ट

दरम्यान, रितेश-जिनिलीया दोघंही मुलांची मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेले होते आणि मुलांना प्रोत्साहन देताना दिसले. याशिवाय दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर जिनिलीया लवकरच आमिर खानबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. तर, रितेश ‘हाऊसफुल्ल ५’ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

Story img Loader