रितेश आणि जिनिलीया देशमुख यांची जोडी बॉलीवूडसह मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघेही हटके व्हिडीओ रिल्स करून त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. सध्या या दोघांच्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Video : माधुरी दीक्षितच्या दिलखेचक अदा, ‘झी मराठी अवॉर्ड्स’मध्ये केला जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले…

रितेश-जिनिलीयाने अनेकवर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०१२ मध्ये लग्नगाठ बांधून आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सध्या जिनिलीयाने शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश “कंजूसला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?” असा प्रश्न बायकोला विचारतो. या प्रश्नावर जराही विचार न करता जिनिलीया नवरा (Husband) असं उत्तर देते.

हेही वाचा : “संजय दादाच्या चित्रपटात…”, मराठी सिनेसृष्टीतील गटबाजीबद्दल तेजस्विनी पंडितने मांडलं स्पष्ट मत, सई ताम्हणकरचा उल्लेख करत म्हणाली…

जिनिलीयाचं हे भन्नाट उत्तर ऐकून रितेशची बोलती बंद झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. या व्हिडीओला अभिनेत्रीने “सगळ्या बायका माझ्या मताशी सहमत असतील” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओला अवघ्या दोन तासांमध्ये ९ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “दोघांची जोडी खूपच छान आहे”, “महाराष्ट्राचे दादा वहिनी” अशा कमेंट्स या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा : “…तेव्हा मला कळलं की ते स्वामीच होते”, विकास पाटीलला अक्कलकोटला स्वामी समर्थांचा आला विलक्षण अनुभव, म्हणाला…

दरम्यान, रितेश देशमुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच तो बहुचर्चित ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय जिनिलीया देशमुख शेवटची ‘ट्रायल पीरियड’ या चित्रपटात झळकली होती.