Riteish Deshmukh Birthday Celebration : बॉलीवूडसह मराठी कलाविश्व गाजवणारा तसेच विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांना ‘वेड’ लावणारा मराठमोळा अभिनेता म्हणून रितेश देशमुखला ओळखलं जातं. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून त्याने मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. अल्पावधीतच रितेशचा हटके अंदाज प्रेक्षकांना भावला आणि घराघरांत त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली. अभिनेत्याने १७ डिसेंबरला त्याचा ४६ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने संपूर्ण कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. याशिवाय त्याच्या कुटुंबीयांनी देखील रितेशसाठी खास Surprise प्लॅन केलं होतं.

रितेशने त्याचा वाढदिवस जवळचे काही मित्रमंडळी आणि कुटुंबीयांबरोबर साजरा केला. अभिनेत्याच्या दोन्ही मुलांनी लाडक्या बाबाच्या वाढदिवसानिमित्त खास प्लॅनिंग केलं होतं. याचा फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. रियान आणि राहीलने बाबासाठी नेमकं काय केलंय पाहुयात…

Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
Milind Gawali
“तुम्ही कायम माझे हिरो”, वडिलांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाले, “पोलीस खात्यातून Retire…”
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”

हेही वाचा : Video : जान्हवी किल्लेकर, घन:श्याम दरवडेचा ‘पुष्पा २’मधील ‘अंगारों’ गाण्यावरील मजेशीर रील पाहिलंत का? नेटकरी म्हणाले…

रितेश देशमुखच्या ( Riteish Deshmukh ) वाढदिवसानिमित्त त्याच्या दोन्ही मुलांनी एक खास गोष्ट केली आहे. याचा फोटो अभिनेत्याने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. रितेश आपल्या वाढदिवसानिमित्त जिनिलीया आणि दोन्ही मुलांसह एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला होता. यावेळी बाबाच्या वाढदिवसासाठी त्याच्या मुलांनी जेवणाचा मेन्यू ठरवला होता.

“डिअर बाबा, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. -रियान, राहील, फ्लॅश ( श्वानाचं नाव )” असा गोड मेसेज लिहून त्याखाली या मुलांनी मेन्यूमध्ये स्टार्टर, मेन कोर्स, डेसर्टसाठी काय-काय ठरवलंय याची नावं पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा : कॉटनची साडी नेसून लंडन फिरली प्रियदर्शिनी इंदलकर! मराठमोळ्या अभिनेत्रीचा देसी अंदाज पाहून चाहते म्हणाले, “फुलराणी…”

Riteish Deshmukh Birthday Celebration
रितेश देशमुखच्या वाढदिवशी दोन्ही मुलांनी ठरवला जेवणाचा मेन्यू ( Riteish Deshmukh Birthday Celebration )

हेही वाचा : “हिंदू धर्माचा रक्षक कोणी बनवलं?”, शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘त्या’ वक्तव्यासाठी मुकेश खन्नांची पात्रता काढली; म्हणाले, “सोनाक्षी…”

रितेश देशमुखला वाढदिवसानिमित्त जिनिलीयाने देखील रोमँटिक पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. “जर तुम्ही उत्कृष्ट मुलगा, खूप चांगला बाबा, best भाऊ, best नवरा म्हणून कोणाकडे पाहत असाल तर तो रितेश आहे आणि तो आधीच पूर्णपणे माझा आहे” असं जिनिलीयाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. दरम्यान, अभिनेत्याच्या ( Riteish Deshmukh ) आगामी कामाबद्दल सांगायचं झालं, तर तो येत्या वर्षात ‘हाऊसफुल्ल ५’ आणि ‘मस्ती ४’ चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader