Riteish Deshmukh Birthday : ‘तुझे मेरी कसम’ म्हणत २००३ मध्ये रितेश देशमुखने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाची हिरोईन होती जिनिलीया डिसोझा. चित्रपटाचं शूटिंग सुरू झाल्यावर पहिल्या भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री होऊन रितेश तिच्या प्रेमात पडला होता. कालांतराने रितेश-जिनिलीया एकमेकांना डेट करू लागले. जवळपास १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनी लग्न केलं. आज रितेश त्याचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त जिनिलीयाने खास रोमँटिक पोस्ट लिहित आपल्या पतीला शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या २२ ते २३ वर्षांत रितेशने मराठीसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. हिंदी चित्रपटांप्रमाणे मराठीतील त्याच्या ‘लय भारी’, ‘वेड’ या चित्रपटांना देखील प्रेक्षकांनी तेवढंच प्रेम दिलं. नुकताच रितेशने होस्ट केलेला ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सुद्धा प्रचंड गाजला. यावरून रितेशची महाराष्ट्रात किती मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे हे लक्षात येतं. आज संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : भुवनेश्वरीचा प्लॅन यशस्वी! सासूला खडेबोल सुनावून अक्षरा घर सोडून जाणार…; मास्तरीण बाईंना अधिपती म्हणाला…

जिनिलीया लाडक्या नवऱ्याला शुभेच्छा देताना लिहिते, “जर तुम्ही उत्कृष्ट मुलगा, खूप चांगला बाबा, best भाऊ, best नवरा म्हणून कोणाकडे पाहत असाल तर तो रितेश आहे आणि तो आधीच पूर्णपणे माझा आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रितेश. तळटीप- मी फक्त तुझी आहे यात काहीच रिफंड होऊ शकत नाही.” ही सुंदर पोस्ट लिहित जिनिलीयाने रितेशबरोबरचा रोमँटिक फोटो देखील शेअर केला आहे.

जिनिलीयाच्या पोस्टवर कमेंट करत रितेश लिहितो, “माझ्या आयुष्यात तुझं येणं हे माझं भाग्यच आहे. आय लव्ह यू बायको. थँक्यू, तू कायम बरोबर असतेस… बायको तुझ्यासाठी माझ्याकडे कोणतीच रिटर्न पॉलिसी वगैरे असू शकतच नाही.”

हेही वाचा : कतरिना कैफ सासूबाईंबरोबर साई चरणी नतमस्तक; विमानतळावर अभिनेत्रीच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, पाहा Video

हेही वाचा : रश्मिका मंदानाने १३ वर्षांनी मोठ्या ‘या’ अभिनेत्याशी केलेला साखरपुडा; ब्रेकअपनंतर आता कसं आहे दोघांचं नातं? जाणून घ्या

दरम्यान, रितेश देशमुखने त्याच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी ( १६ डिसेंबर ) एका प्री बर्थडे पार्टीचं आयोजन केलं होतं. याला रितेश-जिनिलीयाचे जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, आता येत्या वर्षात रितेश ‘हाऊसफुल ५’ आणि ‘मस्ती ४’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

Story img Loader