बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज त्यांचा ८१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. ‘शोले’, ‘डॉन’, ‘सिलसिला’, ‘दिवार’, ‘सूर्यवंशम’, ‘जंजीर’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातून आज अमिताभ बच्चन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : “सुखाचा प्रवास कसा होईल?” वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नम्रता संभेरावची संतप्त पोस्ट; म्हणाली…

अभिनेता रितेश देशमुखने ‘बिग बीं’बरोबरचा जुना फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांना शुभेच्छा देत रितेश लिहितो, “मी खरंच भाग्यवान आहे म्हणून, मला त्यांच्याबरोबर काम करण्याची, एकत्र नाचण्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शेजारी उभं राहण्याची संधी मिळाली. अमिताभ बच्चन सर, तुम्ही माझे हिरो, आयकॉन आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणा आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच देवाचरणी प्रार्थना.”

हेही वाचा : ‘जवान’नंतर संजय लीला भन्साळी यांच्या ‘या’ चित्रपटात झळकणार नयनतारा? रणवीर व आलियाही दिसणार मुख्य भूमिकेत

रितेश देशमुखने ही खास पोस्ट शेअर करत अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा जुना फोटो शेअर केला आहे. यामध्ये रितेश डान्स करत असल्याचं दिसत आहे. याशिवाय या फोटोमध्ये अभिनेत्री प्रीती झिंटा हिची सुद्धा झलक पाहायला मिळते. नेटकऱ्यांनी रितेशने शेअर केलेल्या Unseen फोटोवर कौतुकाचा वर्षावर करत कमेंट सेक्शनमध्ये बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : Video: ३० वर्षांनी काश्मीरमधील घरी परतल्यावर प्रसिद्ध अभिनेत्री भावुक, एका रात्रीत सोडावं लागलेलं घर; म्हणाली, “त्या आठवणी…”

दरम्यान, रितेश देशमुख आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र ‘अलादिन’ या चित्रपटांत काम केलं होतं. दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर अमिताभ बच्चन लवकरच कल्की आणि गणपत चित्रपटात झळकणार आहेत. तसेच रितेश देशमुख सध्या बहुचर्चित हाऊसफुल्ल ५ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

Story img Loader