बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. तब्बल चार वर्षांनंतर या चित्रपटातून शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे त्याचे चाहतेही आतूर होते. संपूर्ण देशभरात शाहरुखच्या या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून २४ कोटींची कमाई करणारा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटासाठी महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुखने ट्वीट केलं आहे. “वादळ येत आहे. तुमचा सीटबेल्ट घट्ट बांधा. खूप दिवसांची प्रतीक्षा करायला लावली. शाहरुख खान तुला शुभेच्छा. पठाण चित्रपटाचं तिकीट मी आधीच बूक केलं आहे”, असं म्हणत रितेशने ‘पठाण’ चित्रपटाचं पोस्टर शेअर करत ट्वीट केलं आहे.

हेही वाचा>> शाहरुख खानच्या ‘पठाण’ला हिंदू संघटनेकडून विरोध, चित्रपटाचा शो बंद पाडला, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच ‘पठाण’ झाला लीक! यशराज फिल्म्स ट्वीट करत म्हणाले…

दरम्यान, रितेश देशमुखचा ‘वेड’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. ३० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अनेक मराठी चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. ‘पठाण’मुळे रितेश देशमुखच्या वेड चित्रपटाच्या कमाईला ब्रेक लागण्याची शक्यता चित्रपट तज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा>> “मिया खलिफा…”, पार्टीतील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सुहाना खान ट्रोल

‘पठाण’ चित्रपटात शाहरुख खानसह बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत असणार आहेत. शाहरुखचा ‘पठाण’ पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहाबाहेर गर्दी करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh booked shah rukh khan pathaan movie tickets shared special post kak