जिनिलीया आणि रितेश देशमुख या दोघांकडे बॉलीवूडमधील आदर्श जोडी म्हणून पाहिले जाते. २०१२ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर दोघेही विविध फोटो, व्हिडीओ शेअर करून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करीत असतात. जिनिलीयाने ब्लॅक ब्लेझर परिधान केलेले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंवर रितेश देशमुखने खास कमेंट करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, कावेरीच्या जिवाला धोका? नवा प्रोमो पाहून प्रेक्षक झाले नाराज

जिनिलीयाने सोशल मीडियावर काळ्या रंगाच्या डिपनेक ब्लेझरमध्ये अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या या हटके लुकचे नेटकऱ्यांनीही कौतुक केले आहे. रितेशने या फोटोंवर कमेंट करीत जिनिलीयाला पुन्हा एकदा लग्नाची मागणी घातली आहे. जिनिलीयाने शेअर केलेले हे नवीन फोटो पाहून रितेशने कमेंट करीत तिला “माझ्याशी लग्न करशील का?” असे विचारले आहे. नवऱ्याच्या प्रश्नाला गोड प्रतिसाद देत जिनिलीयाने सुद्धा “हो आता लगेच” असे उत्तर दिले आहे.

हेही वाचा : दया बेनने का सोडली मालिका? ‘तारक मेहता…’मधील बावरीचा मोठा खुलासा; म्हणाली…

रितेशने जिनिलीयाला पुन्हा एकदा लग्नाची मागणी घातल्याचे पाहून काही नेटकऱ्यांनी “तुम्ही लग्न केलेत म्हणूनच आज त्या आमच्या वहिनी आहेत” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, या ब्लेझरवर जिनिलीयाने सुंदर असे ‘मॉं’ शब्दाचे लॉकेट परिधान केले असून सध्या या लॉकेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दरम्यान, रितेश आणि जिनिलीयाच्या ‘वेड’ या चित्रपटाला अलीकडेच ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘वेड’ चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुखने दिग्दर्शनात पाऊल टाकले, तर जेनिलीयाने या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh comments on genelia deshmukh photos goes viral actor asks will you marry me again sva 00