अभिनेता व चित्रपट निर्माता जॅकी भगनानी आणि अभिनेत्री रकुल प्रित सिंग गोव्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. बुधवारी (२१ फेब्रुवारी रोजी) ते कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न करतील. त्यांच्या लग्नासाठी पाहुणे गोव्यात पोहोचत आहेत. वरुण धवन पत्नी नताशाबरोबर जॅकी व रकुलच्या लग्नासाठी गोव्याला पोहोचला त्यानंतर आता रितेश देशमुखही आईबरोबर गोव्यात दाखल झाला.

रितेशची जॅकी व रकुलशी चांगली मैत्री आहे. इतकंच नाही तर त्यांचं भगनानी कुटुंबाशी जवळचं नातं आहे. जॅकी हा रितेशच्या भावाचा मेहुणा आहे. लातुर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांची पत्नी दिपशिखा देशमुख ही जॅकी भगनानीची सख्खी मोठी बहीण आहे. सोमवारी धिरज या लग्नासाठी गोव्यात पोहोचले, त्यानंतर रितेश व त्याची आई वैशाली देशमुखदेखील गोव्यात आले आहेत. त्यांचा विमानतळावरील एक व्हिडीओ ‘वूम्प्ला’ या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा

जॅकी-रकुल प्रीतची लगीनघाई! मेहुण्याच्या लग्नासाठी गोव्यात पोहोचले आमदार धिरज देशमुख, पाहा Video

दरम्यान, रकुल व जॅकी यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. दोघांच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे. इंडस्ट्रीतील निमंत्रित पाहुणे गोव्यात येत आहेत. बुधवारी या दोघांचं गोव्यात लग्न होईल. आधी रकुल व जॅकी परदेशात लग्न करणार होते, पण नंतर त्यांनी निर्णय बदलला आणि गोव्यात लग्न करायचं ठरवलं.

रितेश देशमुखच्या वहिनीचा सख्खा भाऊ आहे जॅकी भगनानी, बहीण व भाच्यांबरोबर शेअर केलेत खास फोटो

मागच्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या या जोडप्याच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांनी लग्न करणार असल्याचं जाहिर केलं. दोघेही त्यांच्या लग्नाची पत्रिका घेऊन सिद्धीविनायक मंदिरातही गेले होते. त्यानंतर ते व त्यांचे कुटुंबीय गोव्यात लग्नासाठी आले.

Story img Loader