जिनिलिया आणि रितेश देशमुख बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांचे लाखो चाहते असून दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. रितेश आणि जिनिलियाच्या इन्स्टाग्राम रिल्सला चाहत्यांकडून विशेष पसंती मिळते. अशाच एका पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ रितेशने शेअर केला असून यामध्ये तो, भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूसोबत बॅडमिंटन खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच रितेश-जिनिलियाने ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात पी. व्ही. सिंधूसुद्धा सहभागी झाली होती. या वेळी रितेश रंगमंचावर सिंधूसोबत बॅडमिंटन खेळला. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून रितेशनेही हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : “शाहिदमुळे मी कोणाच्या प्रेमात नाही पडले, त्याचे लग्न झाले तेव्हा खूप…” उर्फी जावेदची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत

रितेशने “ढल गया दिन हो गई शाम” या जुन्या बॉलीवूड गाण्यावर ठेका धरत पी. व्ही. सिंधूसोबत बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली. या वेळी रितेशने अतिशय योग्य पद्धतीने बॅडमिंटन खेळण्याचा प्रयत्न केल्याने उपस्थित सहकलाकारांसह पी. व्ही. सिंधूनेही हा व्हायरल व्हिडीओ शेअर करीत रितेशचे कौतुक केले आहे. यावर “तू खूप चांगली आणि सुंदर आहेस…आतापर्यंत तू मिळवलेल्या सर्व सन्मानांबद्दल मला तुझा अभिमान आहे. तुझ्यासोबत बॅडमिंटन खेळण्याची संधी मिळाली याचा जास्त आनंद आहे…आपण पुन्हा जरूर खेळू,” अशी प्रतिक्रिया रितेशने पी. व्ही. सिंधूला दिली आहे.

हेही वाचा : जॅकलीनच्या ‘त्या’ कृतीचे नेटकऱ्यांकडून कौतुक! फोटो झाले व्हायरल, अभिनेत्रीने केले असे आवाहन…

दरम्यान, रितेशने हा व्हिडीओ शेअर केल्यावर यावर त्याच्या लाखो चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत असून, अनेकांनी रितेशला “तू ऑल राऊंडर आहेस,” असे कमेंट्समध्ये सांगितले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh playing badminton with pv sindhu in award funtion video goes viral sva 00