अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांची जोडी मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. जवळपास ८ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर दोघांनीही ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये लग्न केलं. या जोडप्याला आता रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. मात्र, रितेश-जिनिलीयाच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे अभिनेत्री पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता रितेशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “Happy Birthday बाळा!”, सिद्धार्थ चांदेकरची बायको मितालीसाठी रोमँटिक पोस्ट; म्हणाला, “मला नेहमीच…”

मुंबईतील एका कार्यक्रमाला रितेश-जिनिलीयाने जोडीने हजेरी लावली होती. याचा व्हिडीओ विरल भय्यानी या पापाराझी पेजवर शेअर करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान जिनिलीयाने जांभळ्या रंगाचा फुगीर असा वनपीस घातल्यामुळे ती पुन्हा एकदा गरोदर असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या. यावर आता रितेशने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा : “तू मोठी झालीस पण…”, मिताली मयेकरच्या वडिलांनी लाडक्या लेकीला वाढदिवसानिमित्त पाठवला भावुक मेसेज; म्हणाले, “२७ वर्षांपूर्वी…”

जिनिलीया पुन्हा गरोदर आहे का? या व्हायरल बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत, “मला अजून २-३ मुलं चालतील पण, दुर्दैवाने ही बातमी खोटी आहे.” असं रितेशने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा : चाहत्याने थेट छत्रपती संभाजी महाराजांशी केली तुलना, गश्मीर महाजनी म्हणाला, “माझ्यात त्यांच्या…”

सोशल मीडियावर रितेश-जिनिलीयाच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे अभिनेत्री गरोदर असल्याच्या अफवा सुरु झाल्या होत्या. दोघांचेही फोटो व्हायरल होऊ लागले होते. त्यामुळेच पोस्ट शेअर करत रितेशने नेटकऱ्यांचा अंदाज चुकीचा असून जिनिलीया गरोदर नाही असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, वैयक्तिक आयुष्यात जिनिलीयाने दोन मुलांच्या जन्मानंतर मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला होता. परंतु, आता रियान आणि राहील मोठे झाल्यामुळे अभिनेत्रीने पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh reacts to genelia deshmukh pregnancy rumours shared post on social media sva 00