रितेश देशमुख आणि तमन्ना भाटिया यांचा ‘प्लॅन ए प्लॅन बी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. एक जोडी म्हणून ते पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. या रॉमकॉम चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष यांनी केले आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट उपलब्ध आहे. रितेश सध्या या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने शाहरुख खानचे खूप कौतुक करताना दिसला.

रितेशच्या ‘हे बेबी’ या चित्रपटामधील एका गाण्यामध्ये शाहरुखने त्याच्यासह डान्स केला होता. एकाही चित्रपटामध्ये एकत्र काम केले नसूनही त्यांच्यामध्ये घट्ट मैत्री आहे. शाहरुखच्या ‘मन्नत’ या आलिशान बंगल्यामध्ये अनेकदा शानदार पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांमध्ये रितेश आणि त्याची पत्नी जेनेलिया यांना हमखास आमंत्रण दिले जाते. मन्नत बंगल्यामध्ये चालणाऱ्या एका पार्टीमधला किस्सा रितेशने ‘अनफिल्टर्ड बाय समदिश’ या कार्यक्रमामध्ये सांगितला. यावेळी त्याने शाहरुख खानच्या एका सवयीची माहिती दिली.

आणखी वाचा – “मला हृतिकच्या आईची भूमिका विचारणं म्हणजे… ” अभिनेत्री रिचा चड्ढाने केला होता खुलासा

तो म्हणाला, “मन्नत बंगल्यात असणाऱ्या पार्ट्यांमध्ये नियोजन असते. तेथे पाहुण्यासाठी जेवणाची उत्तम व्यवस्था असते. या पार्ट्यांमधील मला आवडणारी गोष्ट म्हणजे शाहरुखचे आदरातिथ्य. जेव्हा तुम्ही पार्टीमधून बाहेर निघता आणि तुमच्या गाडीकडे जात असता, तेव्हा तो (शाहरुख) निरोप देण्यासाठी तुम्हाला गाडीपर्यंत सोडायला येतो. तो गाडीचा दरवाजा उघडून तुम्ही गाडीमध्ये बसेपर्यंत तेथेच थांबतो आणि गाडी सुरु झाल्यावर निरोप घेऊन मगच पुन्हा पार्टींमध्ये जातो. त्याच्याकडून पाहुणचार कसा करावा हे शिकण्यासारखं आहे”

आणखी वाचा – मुख्यमंत्री पदासाठी आखलेले कारस्थान अन् उद्धवस्त झालेले कुटुंब, ‘चाणक्य’ चित्रपटाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये गौरी खानने हजेरी लावली होती. तेव्हा ती शाहरुखच्या या सवयीबद्दलचे स्पष्टीकरण देत म्हणाली, “तो अनेकदा पार्टी सोडून पाहुण्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या गाडीपर्यंत जात असतो. अशा वेळी पार्टीमध्ये असलेले पाहुणे त्याला शोधत असतात. तेव्हा मला आम्ही घराच्या बाहेर पार्टी ठेवली आहे असे वाटते”

Story img Loader