कलाक्षेत्रामधील बहुचर्चित जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख. रितेश व जिनिलियाची खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्रीही कमालीची आहे. दोघंही सोशल मीडियाद्वारे विविध रिल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतात. इतकंच नव्हे तर एकमेकांवर असलेलं प्रेम अगदी खुलेपणाने व्यक्तही करतात. असाच एक व्हिडीओ रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. त्याचीच सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे.
रितेश व जिनिलिया त्यांच्या खासगी आयुष्याबाबत खुलेपणाने व्यक्त होताना दिसतात. दोघंही शेअर करत असलेल्या व्हिडीओ व फोटोंमधून रितेश व जिनिलिया उत्तम पालक आहेत हे दिसूनही येतं. रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जिनिलिया दोन्ही मुलांची उत्तम काळजी घेताना दिसत आहे. तसेच तिचा हसरा चेहरा विशेष लक्ष वेधून घेणारा आहे.
आणखी वाचा – “तर मी माझ्या मुलीसाठी देशही सोडणार आणि…” लेक मालतीबाबत बोलताना प्रियांका चोप्राने केलेलं वक्तव्य चर्चेत
जिनिलिया मुलांना उत्तम सांभाळत आहे, मनमोकळेपणाने हसत आहे हे पाहून रितेशने तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. रितेशने म्हटलं की, “तुम्हाला मिळणारे आशिर्वादही कधीकधी तुम्हाला मोजावे लागतात. कारण तुमचा जोडीदारच तुमचा मित्रही असतो”. रितेशने जिनिलियावरचं प्रेम या पोस्टद्वारे व्यक्त केलं आहे.
आणखी वाचा – सिद्धार्थ जाधवने दाखवली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनच्या घरातील वस्तूंची झलक, म्हणाला “माझा भीमराया…”
रितेशची पोस्ट पाहून जिनिलियाने यावर कमेंट केली आहे. ती म्हणाली, “वा वा…शुक्रवारी सकाळी असणारं प्रेम”. तर चाहत्यांनी या व्हिडीओला अधिकाधिक पसंती दर्शवली आहे. सुपरहिट जोडी, खूप सुंदर, सुखी कुटुंब, जगातील सर्वोत्तम जोडी अशा विविध कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.