रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख या जोडप्याकडे कलाक्षेत्रातील आदर्श जोडी म्हणून पाहिले जाते. जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर दोघांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधून आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. या लोकप्रिय जोडीला आता दोन मुलं आहेत. रितेश-जिनिलीया सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. नवनवे व्हिडीओ, फोटो शेअर करीत ते आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करीत असतात. सध्या रितेशने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हेही वाचा : “मरमर, चिडचिड, रडरड हे शब्द…” सिद्धार्थ चांदेकरने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत, नेटकरी म्हणाले…
रितेश देशमुखने विकी कौशल आणि सारा अली खान यांच्या नव्या चित्रपटातील “तू हैं तो मुझे फिर और क्या चाहिए?” या ट्रेडिंग गाण्यावर जिनिलीयाचा एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. या संपूर्ण व्हिडीओमध्ये रितेश जिनिलीयाची खिल्ली उडवत तिला त्रास देत असल्याचे पाहायला मिळत आहे. बायकोबरोबर शेअर केलेल्या या इन्स्टाग्राम रिल्सला रितेशने “फेव्हरेट गाणे, फेव्हरेट गर्ल” असे कॅप्शन देत जिनिलीयाला टॅग केले आहे.
हेही वाचा : Video : “नताशा दलालची हुबेहूब कॉपी”, ‘त्या’ मुलीला पाहून वरुण धवनचा उडाला गोंधळ, नेटकरी म्हणाले “जुडवा २…”
रितेशने शेअर केलेल्या या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने “भावा आता आम्हाला रडवणार का?” अशी कमेंट केली आहे, तर दुसऱ्या एका युजरने “दोनो को बस एक दुसरे का साथ चाहिए” अशी कमेंट केली आहे. इतर काही युजर्सनी ‘क्यूट कपल’ म्हणत दोघांचे कौतुक केले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, रितेश आणि जिनिलीयाच्या ‘वेड’ या चित्रपटाला अलीकडेच ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुखने दिग्दर्शनात पाऊल टाकले, तर जेनिलीयाने या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.