रितेश आणि जिनिलीया देशमुखची जोडी प्रेक्षकांना फार आवडते. अनेकवर्ष एकमेकांना डेट केल्यावर दोघांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधून आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. रितेश-जिनिलीयाचे दैनंदिन आयुष्यावर आधारलेले बरेच व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होतात. सध्या रितेशने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा : “प्रियांकाला चित्रपटसृष्टीत काम करायचे नव्हते”, मधु चोप्रांनी केला खुलासा; म्हणाल्या, “तेव्हा ती प्रचंड रडली…”

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवरील एका मजेशीर ऑडिओवर व्हिडीओ बनवला आहे. मजेशीर ऑडिओमध्ये रितेश म्हणतो, “बायकोने कितीही काजू-बदाम खाल्ले, तरीही ती नेहमी नवऱ्याचीच कोंडी करते.” ( पत्नीया कितना भी काजू-बदाम खाये, पिस्ता आदमी ही हैं) या व्हिडीओमध्ये रितेशच्या मागे जिनिलीया काजूचे पॉकेट खोलताना दिसत आहे.

हेही वाचा : “…तर माझे ३० चित्रपट झाले असते”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे कास्टिंग काऊचबद्दल गंभीर आरोप

रितेशचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून, अवघ्या तासाभरात त्याच्या व्हिडीओला ६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. रितेश-जिनिलीया त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी असे व्हिडीओ कायम शेअर करत असतात. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, “तू वहिनीला काजू-बदाम आणून का देतोस?” असा प्रश्न विचारला आहे. तर, दुसऱ्या एका युजरने “मला पण रितेश-जिनिलीयासारखे सुंदर वैवाहिक आयुष्य हवे” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा : सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त आलिया भट्टची खास पोस्ट; नीतू कपूर यांचा फोटो शेअर करत म्हणाली, “क्वीन…”

दरम्यान, रितेश देशमुखने अलीकडे त्याच्या बहुचर्चित ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाची घोषणा केली. ‘हाऊसफुल्ल ५’ पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. तर दुसरीकडे, जिनिलीयाचा ‘ट्रायल पीरियड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा सिनेमा २१ जुलै २०२३ ला जिओ सिनेमावर प्रदर्शित केला जाणार आहे.

Story img Loader