ठाण्यात मुक्या प्राण्यांचं ग्रूमिंग सेशन करणाऱ्या एका नामांकित सेंटरमधील धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित सेंटरचा कर्मचारी एका श्वानाला मारहाण करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांसह मनोरंजन विश्वातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाळीव प्राण्यांची शुश्रूषा करणाऱ्या सेंटरमधील हा धक्कादायक प्रकार पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. मराठीसह बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा : लोकप्रिय अभिनेत्री मल्लिका राजपूतने केली आत्महत्या, घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

“ताबडतोब या गुन्हेगाराला अटक करा आणि याला तुरुंगात टाका! हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा” अशी पोस्ट रितेश देशमुखने हा व्हिडीओ शेअर करत लिहिली आहे. अभिनेत्याप्रमाणे नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर कमेंट्स करत संताप व्यक्त केला आहे. तसेच व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मुंबई पोलिसांना टॅग करत याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी मुक्या जनावरांसाठी काम करणाऱ्या काही संस्थांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा : “मॉल संस्कृतीमध्ये आपली परंपरा…”, ‘अबोली’ फेम अभिनेत्रीच्या नव्या व्यवसायाची चर्चा, सुरू केलं संगीतवाद्यांचं दालन

संबंधित घटनेसंदर्भात ‘फ्री प्रेस जनरल’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘प्लांट अँड ॲनिमल्स वेलफेअर सोसायटी’चे (PAWS) संस्थापक नीलेश भानागे यांनी प्राणीप्रेमींच्या वतीने जिल्हा आयुक्तांना पत्र लिहून क्लिनिक आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

रितेश देशमुखने शेअर केला व्हिडीओ

दरम्यान, रितेश देशमुखसह वरुण धवन, प्रतीक बब्बर, अली गोनी यांसारख्या कलाकारांनी देखील ‘स्ट्रीट डॉग्स ऑफ बॉम्बे’ने शेअर केलेल्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh shares angry post after seeing viral of thrashing dogs misconduct by staff sva 00
Show comments