अभिनेता रितेश देशमुख आणिजिनिलीया देशमुख ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. चित्रपट असो किंवा खऱ्या आयुष्यातील वागणे ही जोडी नेहमीच चाहत्यांचे मन जिंकून घेत असते. त्याबरोबरच सोशल मीडियावर विनोदी रीलच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतानादेखील दिसते. आता रितेश देशमुखने जिनिलियाबरोबरचे एक मजेशीर रील शेअर करीत प्रेक्षकांना दिवाळीच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश देशमुखने शेअर केला जिनिलीयाबरोबरचा मजेशीर व्हिडीओ

रितेश देशमुखने सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये रितेश आणि जिनिलीया दिसत आहेत.जिनिलीया काही डायलॉग्जवर अ‍ॅक्टिंग करताना दिसत आहे. ती म्हणते की, एक तर मी इतकी सुंदर आहे. त्यावर रितेश मान हलवीत आहे. त्यानंतर जिनिलिया, त्यात माझे हसणे, असे म्हणून ती विचित्र पद्धतीने हसताना दिसत आहे. अरे दे,वा इतकी सुंदर हसते का मी? असे म्हणून ती परत हसते. ही रील शेअर करताना रितेशने दिलेली कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे.

रितेश देशमुखने व्हिडीओ शेअर करीत लिहिले, “आमच्या दिवाळीसारखीच तुमची दिवाळीदेखील हास्याने भरू दे. तुमच्या बायकोचे हसू माझ्या बायकोसारखेच आहे का? तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा” (आपकी दिवाली भी हँसी से भारी रहे जैसे हमारी है! क्या आपकी बीवी की हँसी भी मेरी बायको की तरह है? आप सभी को दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ)

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

रितेशच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी “पृथ्वीवरचे सर्वांत सुंदर जोडपे”, “दीपावलीच्या शुभेच्छा”, “बॉलीवूडमध्ये इतकी चांगली केमिस्ट्री कोणाची नाही”, असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: “फरसाण खायचं बंद कर”, ऑरा जपण्यासाठी प्राजक्ता माळी काय करते ऐकून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “गावात राहणारा माणूस…”

रितेश आणि जिनिलीया हे त्यांच्या चित्रपट, अभिनयासाठी तर ओळखले जातातच; पण त्याचबरोबर ते ज्या पद्धतीने एकमेकांशी वागतात, एकमेकांना आदर देतात, त्यासाठीदेखील त्यांचे कौतुक होताना दिसते. काही दिवसांपूर्वीच रितेश देशमुख बिग बॉस मराठी ५ चे सूत्रसंचालन करताना दिसला होता. त्यावेळी त्याची मोठी चर्चा झाली होती. याआधीच्या सर्व सीझनचे सूत्रसंचालन अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केले होते. त्यामुळे रितेश देशमुख कसे सूत्रसंचालन करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र रितेश देशमुखने ज्या पद्धतीने शो होस्ट केला, त्याचे सर्व स्तरांतून कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. आता रितेश देशमुख ‘रेड २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.