मातृदिनानिमित्त आज मनोरंजन विश्वातील बहुतांश सेलिब्रिटींनी त्यांच्या आईसाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत. काहींनी त्यांचे बालपणीचे फोटो शेअर केले आहेत, तर काही जणांनी संघर्षाच्या काळात आईने कसा पाठिंबा दिला याबद्दल सविस्तर पोस्ट लिहिल्या आहेत. अगदी याचप्रमाणे अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुखने देखील त्याची पत्नी जिनिलीयासाठी मातृदिनानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिनिलीया आणि रितेश देशमुख यांची जोडी बॉलीवूडसह मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांना महाराष्ट्राचे ‘दादा-वहिनी’ म्हणून ओळखलं जातं. एकमेकांना जवळपास १० वर्षे डेट केल्यावर रितेश-जिनिलायाने २०१२ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने काही दिवस कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. रितेश-जिनिलीयाला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. आज मातृदिनाचं औचित्य साधत अभिनेत्याने त्याच्या पत्नीसाठी खास व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : Video : “चाळीतून थेट २ बीएचके…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा नव्या घरात गृहप्रवेश! नेमप्लेटने वेधलं लक्ष

रितेश देशमुखची मातृदिनानिमित्त खास पोस्ट

रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रियान आणि राहील आपल्या आईबरोबर मजा-मस्ती करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये जिनिलीयाचं तिच्या मुलांशी किती सुंदर बॉण्डिंग आहे हे दिसत आहे. या व्हिडीओला अभिनेत्याने “सर्वात चांगली आई…जिनिलीया तुला मातृदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : “रोजच तुझा दिवस असतो…”, सिद्धार्थ चांदेकरची लाडक्या आईसाठी खास पोस्ट, दिलं गोड सरप्राइज

जिनिलीयाने नवऱ्याने शेअर केलेल्या व्हिडीओवर खास कमेंट केली आहे. ती लिहिते, “लव्ह यू रियान आणि राहील पण, रितेश तुला सुद्धा माझ्याकडून खूप खूप प्रेम…कारण तुझ्यामुळे मी आपल्या मुलांचं चांगलं संगोपन करू शकले आणि एक चांगली आई झाले.”

हेही वाचा : Video : “पप्पा आपली गाडी…”, लोकप्रिय अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी; लेकीचं सरप्राईज पाहून आई-बाबा भावुक

हेही वाचा : कलर्सची ‘ही’ लोकप्रिय मालिका वर्षभरातच घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांच्या पोस्टने वेधलं लक्ष

दरम्यान, रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत जिनिलीयाचं कौतुक केलं आहे. अभिनेत्री आता लवकरच आमिर खानच्या ‘सितारें जमीन पर’ चित्रपटात झळकणार आहे. तर, अभिनेता रितेश देशमुख बहुचर्चित ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh special post for wife genelia on the occasion of mothers day sva 00