काही दिवसांपूर्वी अजय देवगणच्या चाहत्यांना ‘रेड’ चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याची आनंदाची बातमी मिळाली होती. अलीकडेच निर्मात्यांनी ‘रेड २’ चित्रपटाची अधिकृत घोषणा केली होती. या चित्रपटात पुन्हा एकदा अजय आय.आर.एस अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे अजयच्या चाहत्यांना ‘रेड २’ चित्रपटाबाबत अधिक उत्सुकता आहे. अशातच आता ‘रेड २’ चित्रपटाचा खलनायक ठरल्याचं समोर आलं आहे. मराठीत सुपरस्टार मानला जाणार अभिनेता खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘रेड’मध्ये अभिनेता अजय देवगणबरोबर अभिनेत्री इलियाना डीक्रूज झळकली होती. पण आता ‘रेड २’ चित्रपटात बरेच नवे कलाकार पाहायला मिळणार आहे. इलियानाच्या जागी ‘रेड २’मध्ये अभिनेत्री वाणी कपूर पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – सचिन तेंडुलकरने ‘पंचक’ चित्रपटाचं केलं कौतुक, माधुरी दीक्षित व श्रीराम नेनेंचे मानले आभार, म्हणाला…

तसेच ‘रेड’मध्ये खलनायकाची भूमिका अभिनेते सौरभ शुक्ला यांनी साकारली होती. त्यांची ही खलनायकाची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. त्यामुळे ‘रेड २’मध्ये कोण खलनायक असणार? हा अजयच्या चाहत्यांना पडला होता. अखेर तो क्षण आला. ‘रेड २’ चित्रपटातील खलनायक ठरला. हा खलनायक मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारा अभिनेता रितेश देशमुख ‘रेड २’ चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात तो अजयला चांगलीच टक्कर देताना दिसणार आहे. याआधी रितेश साकारलेला ‘एक विलेन’मधील खलनायक चांगलाच गाजला होता. त्यानंतर त्याने ‘मरजावा’मध्ये खलनायक केला. आता तो ‘रेड २’ चित्रपटातून पुन्हा एकदा खलनायकाच्या रुपात पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – प्रेमाची गोष्ट: सईच्या कस्टडीची केस हरल्यानंतर सावनीची इंद्रा कोळीबरोबर धमाल, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, ‘रेड २’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे. अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर स्टारर ‘रेड २’ १५ नोव्हेंबर २०२४ला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh will play villain in raid 2 ajay devgan upcoming movie pps