महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. चित्रपटाव्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील दैनंदिन गोष्टीही ते चाहत्यांसह शेअर करतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ चर्चेत आहे.

रितेश आणि जिनिलिया कुटुंबासह सौदी अरेबियामध्ये फुटबॉलची मॅच पाहण्यासाठी गेले होते. १ फेब्रुवारीला अल-नासर विरुद्ध इंटर मायामी हा फुटबॉलचा सामना किंगडम एरिना, रियाध, सौदी अरेबिया येथे पार पडला. रितेश, जिनिलिया त्यांची मुले रियान आणि राहीलसह; तर रितेशचा भाऊ धीरज, वहिनी दीपशिखा त्यांच्या मुलांसह या सामन्याला उपस्थित होते.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
football player Cristiano Ronaldo and his wife converts to Islam fact check photos
फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्नीसह स्वीकारला इस्लाम धर्म? नमाज अदा करताना PHOTO व्हायरल; पण सत्य काय, वाचा….
Dolly Chaiwala has opened a new office in Dubai. A video shows him working on his laptop in this luxurious space video viral
VIDEO: दहावीनंतर शाळा सोडली आणि चहाची टपरी सुरू केली, ते आज थेट दुबईत इंट्री; ऑफिस पाहून थक्क व्हाल
sharad ponkshe reacts on trolling about daughter education
लेकीला शिकायला अमेरिकेला पाठवल्याने अजूनही होतंय ट्रोलिंग; शरद पोंक्षे म्हणाले, “काही लोकांच्या…”
mudassar khan riya kishanchandani welcome baby girl
Video: वर्षभरापूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न, सलमान खानचा जवळचा मित्र झाला बाबा; पत्नीने मुलीला दिला जन्म

हेही वाचा… ‘अ‍ॅनिमल’नंतर पुन्हा एकदा “जमाल कुडू” गाण्यावर थिरकला बॉबी देओल; भाचीच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल

देशमुख कुटुंब ‘फुटबॉलचा गोट- लिओनेल मेस्सी’ याचे फॅन आहेत. आवडत्या मेस्सीला चिअर करण्यासाठी कुटुंबाने इंटर मायामीची जर्सीदेखील घातली होती. याचे फोटो आणि व्हिडीओ रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत, यात देशमुख कुटुंब खूप आनंदात दिसत आहे.

एका व्हिडीओत तर चक्क मेस्सी मुलांना आणि देशमुख कुटुंबाला हॅलो करताना दिसत आहे. रितेश आणि जिनिलियाच्या मुलांना फुटबॉल खेळ खूप आवडतो. रियान आणि राहीलच्या सरावाचे, मॅचेसचे फोटो आणि व्हिडीओ जिनिलिया नेहमी शेअर करताना दिसते. म्हणून मॅचदरम्यान देशमुख कुटुंबातील चिमुकले मेस्सीचे फॅन स्टेडिअममध्ये आनंद लुटताना दिसले.

दरम्यान, रितेशचा आगामी चित्रपट ‘मस्ती ४’ यावर्षी प्रदर्शित होण्याची चर्चा आहे, तर जिनिलिया ‘ज्यूनियर’ या दाक्षिणात्य चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Story img Loader