रितेश आणि जिनिलीया देशमुख यांची जोडी मराठीसह बॉलीवूड सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय आहे. दोघेही महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून ओळखले जातात. एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यावर २०१२ मध्ये रितेश-जिनिलीयाने थाटामाटात लग्न केलं. या जोडप्याला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. या दोघांच्या संस्कारांचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक होत असतं. सध्या जिनिलीयाने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिनिलीयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रितेश त्याच्या लाडक्या लेकाचे केस कापत असल्याचं पाहायला मिळत आहे. रितेश-जिनिलीया अनेकदा कामानिमित्त आणि चित्रपटांच्या शूटिंगसाठी बाहेर असतात. त्यामुळे शूटिंगमधून ब्रेक घेतल्यावर दोघेही आपल्या मुलांना वेळ देतात.

हेही वाचा : “वडिलांनी ज्या चुका केल्या त्या…” पत्नीला काम करू देण्याच्या निर्णयाबद्दल बॉबी देओलचं विधान चर्चेत

रितेश आणि लेकाचा फोटो शेअर करत जिनिलीया लिहिते, “जेव्हा मुलगा आपल्या बाबांकडे माझे केस कापून द्या असा हट्ट धरतो…माझ्यामते प्रत्येक मुलाला महागड्या गिफ्ट्सपेक्षा आपल्या आई-वडिलांच्या अशा प्रेमाची खूप जास्त गरज असते.” जिनिलीयाने शेअर केलेल्या फोटोमध्ये रितेश घरातच लाडक्या लेकाचे केस कापत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी अभिनेत्याने ‘वेड’ चित्रपटाचं नाव लिहिलेलं टी-शर्ट परिधान केलं होतं.

हेही वाचा : Video: “…एकदा येऊन तर बघा”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रोहित मानेच्या बायकोने घेतला खास उखाणा; व्हिडीओ झाला व्हायरल

दरम्यान, रितेश-जिनिलीया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. वैयक्तिक आयुष्यातील मुलांचं दैनंदिन टाइमटेबल, त्यांचा डबा, फुटबॉलचा सराव या सगळ्या गोष्टींची झलक अभिनेत्री नेहमीच इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर करत असते. आता लवकरच रितेश-जिनिलीयाच्या गेल्यावर्षी ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘वेड’ चित्रपटाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे दोघांचेही चाहते ३० डिसेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ritesh deshmukh trim hairs of his son genelia deshmukh shares photo on instagram sva 00