बालकलाकार म्हणून नावारूपास आलेली रिवा अरोरा सध्या फारच चर्चेत आहे. ‘उरी’,’गुंजन सक्सेना’, ‘भारत’ आणि ‘बंदिश बैंडिट्स’ यांसारख्या कलाकृतींमध्ये तिने केलेल्या कामाचे खूप कौतुक झाले. मात्र नुकत्याच करण कुंद्राबरोबरच्या एका गाण्यामुळे तिला सर्वजण ट्रोल करत आहेत. करण कुंद्रा आणि रिवाने अलिकडेच एका गाण्याचा व्हिडीओ शूट केला आहे. ज्याचं नाव ‘अखियां’ असं आहे. या व्हिडीओ १२ वर्षीय रिवा अरोरा करण कुंद्राबरोबर दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांबाबत सुरु असलेल्या वादांवर शरद केळकरने सोडले मौन; म्हणाला…

या व्हिडीओमध्ये रिवा अरोरा एका अशा मुलीच्या भूमिकेत दाखवली गेली आहे जी आपल्या बॉयफ्रेंडचा विश्वासघात करते आणि करण कुंद्राबरोबर रोमान्स करताना दिसते. या व्हिडीओमध्ये हे चित्रण दाखवल्यामुळे चाहते भडकले आहेत. त्यावरुन करण कुंद्रा आणि रिवाला टीकांना समोरे जावे लागत आहे. रिवाच्या वयावरून अनेकजण तिच्यावर आणि तिच्या पालकांवर निशाणा साधत आहेत. त्यावर रिवाच्या आईने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

रिवा अरोराच्या आईने त्यांचे म्हणणे मांडणारी एक स्ट्रोरी इंस्टाग्रामवर शेअर केली. ती स्टोरी रिवाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्येही शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये रिवाच्या आईने रिवाच्या वयाबद्दल पसरवण्यात येणाऱ्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी लिहिते, “मी आत्तापर्यंत शांत होते पण एका शांत बसणार नाही. माझ्या मुलीच्या वयाबद्दल केले जाणारे सर्व आरोप खोटे आहेत. चुकीच्या बातम्या सर्वात जास्त वेगाने पसरतात असे म्हटले जाते आणि ते अनेक नामांकित सोशल मीडिया चॅनेलने सिद्ध केले आहे. हे सर्व पाहणे माझ्यासाठी दु:खद आणि निराशाजनक आहे.”

पुढे त्या म्हणाल्या, “नामांकित सोशल मीडिया हँडल्सवरून अशा बातम्या पोस्ट करण्यापूर्वी तुम्ही मला संपर्क साधून खरे काय याची तपासणी करायला हवी होती. माझी मुलगी एक अभिनेत्री आहे आणि गेली अनेक वर्षे ती या क्षेत्रात कार्यरत आहे.”

हेही वाचा : करण कुंद्राबरोबर ऑनस्क्रीन रोमान्स करणाऱ्या १२ वर्षीय रिवा अरोराचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर, म्हणाली…

‘अखियां’ या गाण्याच्या व्हिडीओ रिलीज झाल्यावर प्रेक्षकांनी केवळ रिवा करण कुंद्रावरच नाही तर रिवा अरोराच्या पालकांवरही राग काढला होता. रिवा अजूनही लहान आहे आणि तिला अशा प्रकारे ऑनस्क्रीन लैंगिक किंवा रोमँटिक भूमिकांमध्ये दाखवणे योग्य नाही, असे नेटकऱ्यांचे म्हणणे होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riva aroras mother gave reply to trollers through her latest instagram post rnv