बॉलीवूडमध्ये एखाद्या कॉन्ट्रोव्हर्सीनंतर त्याचा करिअरवर परिणाम झालेले अनेक कलाकार आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे, जिचं बॉलीवूडमधील करिअर एका एमएमएसमुळे संपलं. त्यानंतर तिने बंगालीसह दक्षिणेतील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांमध्ये काम केल, पण तिथे तिला बॉलीवूडइतकं यश मिळालं नाही. रिया सेनं असं या अभिनेत्रीचं नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिया सेनचा राजघराण्याशी संबंध आहे. तिचे वडील भरत देव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्यातील आहेत. ते कूचबिहारच्या राजकन्या इला देवी यांचे पूत्र आणि जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांचे पुतणे होते. रिया सेनची आई मून मून सेन आणि आजी सुचित्रा सेन या दिग्गज अभिनेत्री होत्या. रियाने अभिनय कारकिर्दीची सुरुवात पाच वर्षांची असताना केली होती. तिने पहिल्यांदा पडद्यावर तिच्या आईच्या मुलीची भूमिका साकारली होती. तिने ‘विष्कन्या’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं.

“तुमच्या मुलाला खूप…”, ‘अ‍ॅनिमल’ मध्ये रणबीर कपूरसह काम केल्यानंतर दिग्गज अभिनेत्याने नीतू कपूर यांना केला होता मेसेज

‘डीएनए’ च्या वृत्तानुसार, १९९८ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी फाल्गुनी पाठकच्या ‘याद पिया की आने लगी’ या म्युझिक व्हिडीओमध्ये रियाने काम केलं आणि ती लोकप्रिय झाली. नंतर तिने अनेक चित्रपट, संगीत व्हिडीओ केले. ती अनेक फॅशन शोमध्येही दिसली. तिचा पहिला हिट चित्रपट २००१ साली आलेला ‘स्टाइल’ होता. मग तिने ‘झनकार बीट्स’ आणि मल्याळम सिनेमा ‘अनंथभद्रम’मध्ये काम केलं होतं. या काळात रियाच्या अफेअरच्या चर्चाही होऊ लागल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रियाचे अक्षय खन्ना आणि एका प्रसिद्ध लेखकाशी अफेअर होते. पण त्या लेखकाने आणि रिया यांनी कधीच याबाबत भाष्य केलं नाही. पण ते काही काळाने वेगळे झाले, असं म्हटलं जातं. रियाचं नाव माजी भारतीय क्रिकेटपटू श्रीशांतशी जोडलं गेलं होतं. नंतर रियाने २०१७ मध्ये शिवम तिवारीशी लग्न केलं.

Photos: प्रसिद्ध अभिनेत्रीने IFS अधिकाऱ्याशी बांधली लग्नगाठ; शिव-पार्वतीचे लग्न झालेल्या प्राचीन मंदिरात घेतले सात फेरे

२००५ साली रिया सेन आणि अभिनेता अश्मित पटेल यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. यादरम्यान दोघांचा एक एमएमएस लीक झाला आणि मग खूप मोठी कॉन्ट्रोव्हर्सी झाली. त्यावेळी काही लोकांनी रियाने लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःच हा एमएमएस जाणीवपूर्वक लीक केल्याचा आरोप केला होता, पण रिया आणि अश्मित दोघांनीही हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलं होतं. रिया आणि अश्मितचा एमएमएस फेक होता, पण तो लीक झाल्याने तिचे करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

“मी त्याला…”, विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या रायच्या अफेअरबद्दल कळाल्यावर ‘अशी’ होती वडील सुरेश ओबेरॉय यांची प्रतिक्रिया

रियाला बॉलीवूडपासून दूर जावे लागले. रियाने गेल्या काही वर्षांत इतर प्रादेशिक भाषांमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नंतर २०१६ ते २०१९ या काळात ती ‘अलिशा’, ‘रागिनी एमएमएस: रिटर्न’, ‘जहर’ आणि ‘मिसमॅच २’ या वेब सीरिजमध्येही झळकली, पण ओटीटीवरही तिला फारसं यश मिळालं नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riya sen career spoiled after her mms with ashmit patel leaked she is daughter of actress munmun sen hrc