बहुप्रतिक्षीत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा बॉलीवूड चित्रपट शुक्रवारी (२८ जुलै) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिग्दर्शक करण जोहरचा कमबॅक चित्रपट असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांच्यासह अनेक कलाकार आहेत.
“करण सरांच्या ऑफिसमधून फोन…”, पत्नीसाठी हेमंत ढोमेची खास पोस्ट; म्हणाला, “त्या सगळ्या झगमगाटात…”
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाची गेले काही दिवस चांगलीच चर्चा होती. अखेर चित्रपट प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. ‘सॅकनिल्क’च्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी ११.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. अधिकृत आकडेवारी आल्यानंतर यात थोडा बदल असू शकतो.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण १६० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाची कमाई अपेक्षेप्रमाणे कमी असल्याचं म्हटलं जात आहे. पुढे दोन दिवस वीकेंड आहे, त्यामुळे शनिवार आणि रविवारच्या सुट्टीत हा चित्रपट जबरदस्त कलेक्शन करेल, असा अंदाज आहे.
दरम्यान, करण जोहरने सात वर्षांनी दिग्दर्शनात पुनरागमन केलं आहे. फॅमिली ड्रामा असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये ‘गली बॉय’नंतर पुन्हा एकदा आलिया व रणवीर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात आलियाने बंगाली मुलीची तर रणवीरने पंजाबी मुलाची भूमिका साकारली आहे.