Rocky aur Rani Ki Prem Kahaani Box office collection Day 7 : करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. २८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी दमदार कमाई केली होती. या चित्रपटातील आलिया भट्ट आणि रणवीर सिंहची जोडी आणि त्यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. वीकेंडला चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

आता मात्र चौथ्या आणि पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट बघायला मिळाली. ‘बॉलिवूड हंगामा’च्या रीपोर्टनुसार या चित्रपटाने मंगळवारी ७.२५ ते ७.७५ कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘सॅकनिक’च्या रीपोर्टनुसार या चित्रपटाने सातव्या दिवशी ६.५० कोटींचा व्यवसाय केला आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण ७३.६२ कोटींची कमाई केली आहे.

The Storyteller Movie Review in marathi
द स्टोरीटेलर : गोष्टीच्या गोष्टीची सुरेख वीण
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Laxmichya Paulanni
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्यांदा मारली बाजी; कलाकारांनी सेटवर ‘असं’ केलं सेलिब्रेशन
Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
vicky kaushal increase weight and also learn horse riding
‘छावा’मध्ये कास्ट करण्याआधी दिग्दर्शकाने विकी कौशलला सांगितलेल्या ‘या’ दोन गोष्टी; म्हणाला, “मी ७ ते ८ महिने…”
star pravah tharla tar mag and lagnanantar hoilach prem sangeet ceremony
तब्बल ३३ कलाकार, सलग ३ दिवस शूट अन्…; ‘स्टार प्रवाह’च्या २ मालिकांचा महासंगीत सोहळा ‘असा’ पडला पार, दिग्दर्शक म्हणाले…
Film Acting Demar and Devar Hindi Cinema
चित्रपट: देमार आणि देव्हारपटांची पन्नाशी…
zee marathi tv serial mahasangam meghan jadhav reveal efforts behind shoot
२५० क्रू मेंबर्स, ६० कलाकार अन्…; २ मालिकांच्या ‘महासंगम’साठी केली ‘अशी’ तयारी! पुण्यात ‘या’ ठिकाणी पार पडलं शूटिंग

आणखी वाचा : “पठाणने एक मोठा गैरसमज…” राम गोपाल वर्मा यांचं शाहरुख खानबद्दलचं वक्तव्य चर्चेत

भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला १०० कोटींचा टप्पा पार करण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. सात दिवसातही या चित्रपटाला १०० कोटींचा टप्पा पार करता आलेला नसल्याने याबद्दल चर्चा सुरू आहे. चित्रपटाचं बजेट आणि त्याला मिळणारा प्रतिसाद बघता हा टप्पा खरंतर ५ दिवसांतच पार करायला हवा होता.

या चित्रपटातून करण जोहरने तब्बल ८ वर्षांनी पुन्हा दिग्दर्शक म्हणून कमबॅक केलं आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये आलियाने बंगाली मुलीची तर रणवीरने पंजाबी मुलाची भूमिका साकारली आहे. तसेच धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, क्षिती जोग यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

Story img Loader