करण जोहर दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत. अलीकडेच या चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला होता. यानंतर आता ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील पहिले गाणे “तुम क्या मिले…” प्रदर्शित करण्यात आले आहे.

हेही वाचा : शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटाचा टीझर लवकरच होणार प्रदर्शित; चेन्नईत संपन्न होणार भव्य सोहळा?

when udit narayan kissed shreya ghoshal
Video: उदित नारायण यांनी श्रेया घोषालला भर मंचावर केलेलं किस; गायिकेची प्रतिक्रिया झालेली व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
chhaava film jane tu first song release starring vicky kaushal
हिंदवी स्वराज्य, महाराणी येसूबाईंची साथ अन्…; ‘छावा’चं पहिलं गाणं प्रदर्शित! ‘तो’ क्षण पाहून चाहते झाले भावुक, म्हणाले…
litile girl Singing
चिमुकलीने गायले “मेरे ख्वाबों में जो आए” गाणे! नेटकरी म्हणे, ‘हा तिचा आवाज नाही”, Viral Videoचे काय आहे सत्य?
Marathi actress Prajakta Mali Praised to thet tumchya gharatun drama
“थेट तुमच्या काळजाला हात घालतं…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधल्या कलाकारांच्या ‘या’ नाटकाचं प्राजक्ता माळीने केलं कौतुक, म्हणाली, “ओंकारचं गाणं…”
chhaava movie santosh juvekar talks about last scene of movie
“आपले महाराज एकटे…”, ‘छावा’मधला ‘तो’ शेवटचा सीन आठवून संतोष जुवेकरचे डोळे पाणावले; साकारतोय ‘ही’ भूमिका
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’टीझर लॉन्च झाल्यावर “तुम क्या मिले…” गाण्याची जोरदार चर्चा सुरु होती. कारण, चित्रपटाच्या टीझरमध्ये निर्माता करण जोहरने एकही संवाद न घेता बॅकग्राऊंडला हे गाणे जोडले होते. “तुम क्या मिले…” या ३ मिनिटे २१ सेकंदाच्या गाण्याचे संपूर्ण शूटिंग बर्फाळ प्रदेशात केले असून आलियाच्या शिफॉन साड्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. हे गाणे प्रितम यांनी संगीतबद्ध केले असून गाण्याचे लेखन अमिताभ भट्टाचार्यांनी केले आहे.

हेही वाचा : ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करण्यासाठी २३ वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी ठेवली होती ‘ही’ अट; निर्माते खुलासा करत म्हणाले…

बॉलीवूडमधील कोणत्याच चित्रपटातील गाणी सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंहशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत असे म्हणतात. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चित्रपटाला सुद्धा अरिजितच्या जादुई आवाजाची साथ मिळाली आहे. “तुम क्या मिले…” हे ड्युएट गाणे लोकप्रिय गायक अरिजित सिंह आणि गायिका श्रेया गोषाल यांनी गायले आहे. चित्रपटातील कलाकारांपेक्षा गाणे रिलीज झाल्यावर नेटकरी अरिजित आणि श्रेयाच्या आवाजाचे कौतुक करीत आहेत.

हेही वाचा : मालदीवमध्ये सोनाली सेहगलचा बोल्ड अंदाज; पतीबरोबर शेअर केले रोमँटिक फोटो

चित्रपटात रणवीर सिंह रॉकी रंधवा आणि आलिया भट्ट राणी चॅटर्जीची भूमिका साकारणार आहे. टीझरमध्ये आलियाने बहुतांश सीन्समध्ये साडी नेसलेली दिसत आहे. ‘रॉकी और रानी…’च्या निमित्ताने करण जोहरने तब्बल ७ वर्षांनी दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली आहे. आलिया भट्ट, रणवीर सिंह यांच्याशिवाय या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री जया बच्चन, अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. २८ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader