बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने करण जोहरने ७ वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. काही दिवसांपूर्वी ‘रॉकी और रानी…’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. टीझर पाहिल्यावर अनेकांना करणच्या ९० च्या दशकातील शाहरुख-काजोलच्या सिनेमांची आठवण झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “तुम क्या मिले…” अरिजित सिंहच्या आवाजाने जिंकली प्रेक्षकांची मनं; रणवीर-आलियाच्या ‘रॉकी और रानी…’मधील पहिलं गाणं रिलीज

‘रॉकी और की प्रेम कहानी’ चित्रपटातील ‘तुम क्या मिले’ या गाण्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हे गाणे प्रदर्शित होण्यापूर्वी करण जोहरने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली होती. यामध्ये आलियाविषयी किस्सा सांगताना करण कॅप्शनमध्ये लिहितो की, “आलियाने तिच्या मुलीला जन्म दिल्यावर आम्ही ‘तुम क्या मिले’ या गाण्याचे शूटिंग केले. राहाच्या जन्मानंतरचे आलियाचे हे पहिले गाणे आहे. राहाच्या जन्मानंतर आलिया या गाण्याच्या शूटसाठी काश्मीरला रवाना झाली होती. तसेच बाळाला जन्म दिल्यावर ‘तुम क्या मिले’साठी तिला एवढ्या थंडीत मनिष मल्होत्राने डिझाईन केलेल्या शिफॉन साड्या नेसाव्या लागल्या म्हणून मी आलियाची माफी मागतो.”

हेही वाचा : शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटाचा टीझर लवकरच होणार प्रदर्शित; चेन्नईत संपन्न होणार भव्य सोहळा?

करण पुढे म्हणाला, “मी स्वत: यानंतर काही दिवस आजारी होतो. तसेच अभिनेता रणवीर सिंह सुद्धा त्याचे बर्फाळ प्रदेशातील पहिलेच शूट असल्याने खूप तणावात होता, परंतु त्यानंतर प्रत्यक्ष गाण्यात त्याने कमाल केली आहे. ‘तुम क्या मिले…’ हे सुंदर गाणे मी माझे गुरु यश चोप्रा यांना अर्पण करीत आहे. माझ्या डोक्यात कायम हाच विचार होता की, मी त्यांची बरोबरी केव्हाच करू शकणार नाही तरीही ‘तुम क्या मिले’च्या निमित्ताने मी हा लहानसा प्रयत्न केला.”

दरम्यान, चित्रपटात रणवीर सिंह रॉकी रंधवा आणि आलिया भट्ट राणी चॅटर्जीची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात दिग्गज अभिनेत्री जया बच्चन, अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. २८ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.