करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. २८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ११.५० कोटींची कमाई केली होती. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये गर्दी केली होती. चित्रपटगृहामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता चित्रपट ओटीटवर प्रदर्शित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- अल्लू अर्जुनने पहिला शाहरुख खानचा ‘जवान’, प्रतिक्रिया देत अभिनेता म्हणाला, “चित्रपटाचे निर्माते…”

हा चित्रपट या आठवड्याच्या सुरुवातीलाच अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागणार आहेत. हा चित्रपट पुढील ३० दिवसांसाठी प्राइम व्हिडिओवर पैसे भरून हा चित्रपट पाहता येणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाचा मोफत आनंद घेता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यापूर्वी या चित्रपटातील काही सीन्स हटवण्यात आले होते. आता ओटीटीवर प्रदर्शित करताना या चित्रपटात ते सीन्स पुन्हा टाकण्यात आले आहेत. त्यामुळे ओटीटी प्रेक्षकांना हटवण्यात आलेले सीन्स पाहता येणार आहेत.

हेही वाचा- ‘बेटे को हाथ लगाने से पहले…’ ‘जवान’मधील हा डॉयलॉग स्क्रिप्टमध्ये नव्हताच, लेखक खुलासा करत म्हणाला, “शाहरुख सरांनी…”

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातून करण जोहरने तब्बल ८ वर्षांनी पुन्हा दिग्दर्शक म्हणून कमबॅक केलं आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये आलियाने बंगाली मुलीची तर रणवीरने पंजाबी मुलाची भूमिका साकारली आहे. तसेच धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, क्षिती जोग यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rocky aur rani ki prem kahani ott release film is now on amazon prime dpj