करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर आणि दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली. ‘तुम क्या मिले…’ या पहिल्या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, ‘व्हॉट झुमका’ गाण्याला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. ‘व्हॉट झुमका’ हे गाणे १२ जुलैला दुपारी १२ वाजता रिलीज करण्यात आले. या गाण्यात रणवीर-आलियाची अफलातून डान्स केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “साडीच्या घड्यांमध्ये आई पैसे साठवायची” ‘बाईपण भारी देवा’ फेम अभिनेत्रीने सांगितला किस्सा; म्हणाल्या, “आम्ही नवं घर…”

“झुमका गिरा रे…” हे मूळ गाणे १९६६ मध्ये ५७ वर्षांपूर्वी रिलीज झाले होते. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटासाठी या गाण्याला रिक्रिएट करण्यात आले असून आता हे गाणे ‘व्हॉट झुमका’ अशा शीर्षकाने प्रसिद्ध करण्यात आले. हे गाणे अरिजित सिंह आणि जोनिता गांधी यांनी गायले आहे. परंतु, ‘झुमका’ गाण्याचे रिक्रिएशन प्रेक्षकांना अजिबातच आवडलेले नाही.

हेही वाचा : “माझ्याजागी रणबीर कपूरचा चेहरा लावला…”; ‘अ‍ॅनिमल’च्या व्हायरल पोस्टरवर बंगाली अभिनेत्याने केलेले वक्तव्य चर्चेत

आलिया भट्टने शेअर केलेल्या ‘झुमका’ गाण्याच्या व्हिडीओवर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. नेटकऱ्यांनी हे गाणे ऐकून करण जोहरसह चित्रपटाच्या संपूर्ण टीमला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने “हे गाणे ट्रेलरपेक्षा वाईट आहे”, अशी कमेंट केली आहे. तर, दुसऱ्या एका युजरने “जुन्या गाण्याला रिक्रिएट का करता? तुमच्याकडे स्वत:चे असे काही नाहीये का?” असा प्रश्न चित्रपटाच्या टीमला विचारला आहे.

हेही वाचा : “माझी माणसं…”, ‘बिग बॉस’ विजेता अक्षय केळकर गेला पावसाळी ट्रेकला, व्हिडीओत दिसली ‘या’ अभिनेत्रीची झलक

दरम्यान, करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘रॉकी और रानी…’ २८ जुलैला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rocky aur rani ki prem kahani second song what jhumka song out now ranveer singh and alia bhatt trolled by netizens sva 00