अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. रणवीर या चित्रपटात ‘रॉकी रंधावा’ हे पात्र साकारणार आहे. नुकताच रणवीरच्या ‘रॉकी रंधावा’ पात्राची ओळख करून देणारा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेत्याचा फिटनेस आणि हॉट अंदाज पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : जिनिलीया आणि रितेश देशमुख एकमेकांना कोणत्या नावाने हाक मारतात? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, “माझ्या सासूबाई…”

रणवीर सिंहने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘रॉकी रंधावाचे मंडे मोटिव्हेशन’ असे लिहिले आहे. संपूर्ण व्हिडीओमध्ये रणवीरचा हॉट, डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे. अभिनेत्याच्या व्हिडीओवर बायको दीपिका पदुकोणसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करून त्याचे कौतुक केले आहे. या सगळ्यात एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा : ‘गदर २’ आणि ‘OMG २’ एकाच दिवशी होणार प्रदर्शित; बॉक्स ऑफिस क्लॅशबद्दल सनी देओल म्हणाला, “ज्या चित्रपटांची बरोबरी…”

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने रणवीरच्या व्हिडीओवर आश्चर्य व्यक्त “स्क्रीन इज ऑन फायर, हॉट” अशी प्रतिक्रिया दिली आहे. अमृता खानविलकर आणि रणवीर सिंह एकमेकांचे अनेक वर्षांपासून चांगले मित्र आहेत. अमृताने आतापर्यंत केलेले सिनेमे, डान्स परफॉर्मन्स याचे रणवीर आवर्जुन कौतुक करताना दिसतो.

हेही वाचा : Video: गुलाबी कपडे घालून ‘बार्बी’ चित्रपट पाहण्यासाठी गेला लोकप्रिय गायक, नेटकरी ट्रोल करत म्हणाले, “मुलींना…”

दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट येत्या २८ जुलैला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत. याशिवाय धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असतील. तसेच ‘रॉकी और रानी…’च्या निमित्ताने तब्बल ७ वर्षांनी करण जोहरने पुन्हा एकदा दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rocky aur rani kii prem kahaani ranveer singh character introduction video viral amruta khanvilkar writes special comment sva 00