’12वीं फेल’ या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. अवघे २० कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने ६६ कोटींहून अधिक कमाई केली आहे. २०२३ मधील शेवटच्या दोन महिन्यात अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले, पण हा चित्रपट त्यातही टिकून राहिला आणि तुफान कमाई करत राहिला. २०२३ मधील सर्वात हिट चित्रपटांपैकी हा एक आहे. हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टीने आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबरचा एक फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. “12 वीं फेल” चे खरे हिरो मनोज कुमार शर्मा यांच्याशी भेट. कोविड काळात त्यांच्याबरोबर काम करण्याचा मान मिळाला होता, त्यावेळी ते मुंबई पोलिसांसाठी सेवा देत होते… जर तुम्ही १२ वीं फेल चित्रपट पाहिला नसेल तर कृपया पाहा… ही एक प्रेरणादायी कथा आहे, खासकरून विद्यार्थी आणि तरुणांसाठी,” असं कॅप्शन रोहित शेट्टीने दिलं आहे. यावर ‘The two of you!!!’ अशी कमेंट विक्रांत मेस्सीने केली आहे आणि रेड हार्ट व फायर इमोजी पोस्ट केले आहेत.

“अक्षय कुमारच्या स्टाफपेक्षा कमी मानधन मिळालं अन् त्यांच्यासमवेत…”, मुश्ताक खान यांचा खुलासा; म्हणाले, “दुर्दैवाने…”

’12वीं फेल’ हा अत्यंत सुंदर चित्रपट आहे. यामध्ये आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांनी खडतर परिस्थितीत हाताला मिळेल ते काम करत युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याचा प्रवास दाखविण्यात आला आहे. त्यांची ही कहाणी आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी प्रचंड प्रेरणादायी आहे.

Story img Loader