रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, रणवीर सिंह आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. आता एका मुलाखतीत अजय देवगणने केलेल्या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे.

रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा

अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी नुकतीच रणवीर अल्लाहबादियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत अजय देवगणने तो लोकांना मारहाण करायचा, असे वक्तव्य केले आहे. “त्या काळातली अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्याबद्दल मला बोलायचे नाही”, असे अभिनेत्याने म्हटले. तो आतादेखील मारामारी करतो का? यावर उत्तर देताना अजय देवगणने म्हटले, “आता मी मारामारी करीत नाही. भांडत नाही. सगळेच आता शांत झाले आहेत. आता मी भांडत नाही. हे सगळं मला वेळेचा अपव्यय करण्यासारखं वाटतं. मी विचार करतो की, समोरच्याला फक्त मार बसेल, त्यामुळे हे सगळं मी टाळतो”, असे अजय देवगणने म्हटले आहे. काही भांडणात लोकांना हॉकी स्टिकने मारले असल्याचे अजय देवगणने मान्य केले.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

रोहित शेट्टीने याबद्दल बोलताना म्हटले, “अजय देवगण कारमध्ये हॉकी स्टिक ठेवायचा.” ९० च्या दशकातील आठवण सांगताना रोहित शेट्टीने म्हटले, “असा एक काळ होता की, मुंबईत यानं कोणालातरी मारलं होतं. एक कार त्याला थांबवण्यासाठी त्याचा पाठलाग करीत होती.” त्याबरोबरच लोकांना तो कशाने मारायचा याबद्दल बोलताना दिग्दर्शकाने म्हटले, “तो सोडा बॉटलचा वापर करायचा.”

या मुलाखतीत अजय देवगणने म्हटले, “चित्रपटसृष्टीत आताच्या पिढीतील कलाकारांमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या पुरुषांचं व्यक्तिमत्त्व कमी दिसत आहे. सगळी मुलं आहेत. आधीच्या पिढीत जॅकी श्रॉफ ते अमिताभ बच्चन यांच्यामध्ये ते दिसतं.” यावर बोलताना रोहित शेट्टीने म्हटले, “जेव्हा अक्षय कुमार १० लोकांशी एकटा लढताना दिसायचा किंवा सनी देओल हातानं हॅण्ड पंप बाहेर काढायचा, तेव्हा आम्ही टाळ्या वाजवायचो. कारण- आम्हाला विश्वास असायचा की ते करू शकतात. आताच्या पिढीत असं कोणी करू शकेल, असं वाटत नाही.”

आताच्या पिढीमधील कलाकारांना तो मुले म्हणून का बघतो, यावर बोलताना अजय देवगणने म्हटले, “त्यांचं राहणीमान बदललं आहे. त्यांच्या पालनपोषणात बदल झाला आहे. फक्त चांगलं शरीर तयार करून जगण्याचा तो दृष्टिकोन मिळत नाही. आताच्या पिढीमध्ये आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.”

हेही वाचा: “आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”

अजय देवगणच्या कामाबद्दल बोलायचे, तर त्याच्या करिअरची सुरुवात फूल और कांटे या चित्रपटातून झाली होती. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. अभिनेता ‘जिगर’ (१९९२), ‘विजयपथ’ (१९९४), ‘सुहाग’ (१९९४), ‘जमीन’ (२००३) यांसारख्या अनेक गाजलेल्या ॲक्शन चित्रपटांचा भाग आहे. त्याबरोबरच खाकी (२००४) आणि रोहित शेट्टीचा सिंघम (२०११) या ॲक्शन चित्रपटात त्याने काम केले आहे. दरम्यान, ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर नऊ दिवसांत १९२.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Story img Loader