रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’ची जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं असून या चित्रपटात कलाकारांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. अजय देवगण आणि करीना कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेतच. शिवाय ‘सूर्यवंशी’ आणि ‘सिंबा’ म्हणजेच अक्षय कुमार व रणवीर सिंहसुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत. मध्यंतरी या चित्रपटाचा एक जबरदस्त अॅक्शन सीन शूट झाल्याचं करीनाने तिच्या पोस्टमध्ये शेअर केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतकंच नव्हे तर या चित्रपटात आणखी बरीच सरप्राइजेस आहेत. दीपिका पदूकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूरसुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून या कॉप युनिव्हर्सशी जोडले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील दीपिका, रणवीर आणि टायगरचा धासु लुक समोर आला होता, आता या चित्रपटातील खऱ्या हीरोचा अर्थात बाजीराव सिंघमच्या भूमिकेतील अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

आणखी वाचा : “मी आईला स्क्रीनवर पाहतो तेव्हा…” मिथुन चक्रवर्ती यांचा सुपुत्र नमाशीचे आई योगिता बालीबद्दलचे विधान चर्चेत

दिग्दर्शक रोहित शेट्टी याने नुकतंच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अजय देवगणचा हा सिंघम लूक शेअर केला आहे. या फोटोमध्ये अजय देवगणच्या बरोबरीनेच एक जबरदस्त सिंहाचा लूकसुद्धा पाहायला मिळत आहे. या पोस्टमध्ये अजय देवगण त्याच्या नेहमीच्या डॅशिंग अंदाजात दिसत आहे. त्याच्या डोळ्यात एक वेगळाच जोश आणि राग आपल्याला पाहायला मिळत आहे. या पोस्टमध्ये रोहित शेट्टीने लिहिलं की, “शेर आतंक मचाता है, और जखमी शेर तबाही! सगळ्यांचा लाडका अधिकारी बाजीराव सिंघम पुन्हा आला आहे.”

सोशल मीडियावर अजय देवगणच्या या धासु फर्स्ट लुकची जबरदस्त चर्चा आहे. ‘सिंघम अगेन’चं चित्रीकरण सुरू झालं असून मुंबईचा यश राज स्टुडिओ आणि हैद्राबादमधील चित्रीकरण पूर्ण झाले आहे. तसेच आता लवकरच या चित्रपटाचा जबरदस्त क्लायमॅक्स चित्रित होणार आहे ज्यावर तब्बल २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. १५ ऑगस्ट २०२४ रोजी ‘सिंघम अगेन’ प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’सुद्धा येणार आहे. अद्याप कोणत्याही निर्मात्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याबद्दल भाष्य केलेलं नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit shetty shares first look of ajay devgan as bajirao singham from singham again avn