जया बच्चन बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. अभिनयाव्यतिरिक्त जया बच्चन आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतात. ३ जून १९७३ रोजी जया बच्चन यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला आता जवळपास ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, नुकत्याच एका कार्यक्रमात जया बच्चन यांनी वैवाहिक जीवनातील अनुभव शेअर केले आहेत.
अमिताभ व जया बच्चन यांच्याप्रमाणे त्यांची नात नव्या नवेली नंदाही नेहमीच चर्चेत असते. नव्याचा चाहतावर्गही मोठा आहे. नव्या अभिनय क्षेत्रापासून लांब असली तरी सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते. आता नव्या एका नवा कारणामुळे ती चर्चेत आली आहे. लवकरच तिचा पॉडकास्ट शो ‘व्हॉट द हेल नव्या’ प्रदर्शित होणार आहे. नुकताच या पॉडकास्टच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला. दुसऱ्या सीझनच्या पहिल्या भागात नव्याची आजी म्हणजे अभिनेत्री जया बच्चन व आई श्वेता नंदा हजेरी लावणार आहेत.
‘व्हॉट द हेल नव्या’च्या एपिसोडमध्ये जया बच्चन व श्वेता नंदाने अनेक मनोरंजक खुलासे केले आहेत. त्यामध्ये जया बच्चन नव्या आणि श्वेता नंदाला शिव्या देण्यावरून फटकारताना दिसल्या. एवढंच नाही, तर जया बच्चन यांनी लग्नानंतरच्या रोमान्सबाबतही भाष्य केले आहे. “रोमान्सला खिडकीच्या बाहेर काढा. लग्नानंतर रोमान्स संपतो” असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यानंतर श्वेता नंदा आईकडे बघून म्हणते, “मला माहिती आहे घरात काय सुरू आहे?” जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा- कॉमेडीयन रोहन जोशीची यंदाच्या फिल्मफेअर पुरसकरांवर मार्मिक टीका; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
जया बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात त्या झळकल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. करण जोहर निर्मित या चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंह, धर्मेंद्र व शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.