सलमान खान सध्या आगामी ‘टायगर ३’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. त्यामुळे सध्या सलमानचे चाहते त्याच्या ‘टायगर ३’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच भाईजान टायसन फ्यूरी आणि फ्रान्सिस नगनौ यांच्यातील बॉक्सिंगचा सामना पाहण्यासाठी सौदी अरबला गेला होता. हा सामना पाहण्यासाठी जगप्रसिद्ध खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो त्याच्या गर्लफ्रेंड जॉर्जिना रोड्रिग्जबरोबर उपस्थित होता. यादरम्यानचे सलमान आणि रोनाल्डचे बरेच फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे; ज्यामध्ये रोनाल्डोने सलमानकडे दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video: कुशल बद्रिकेने सोनाली कुलकर्णीवर केला विनोद अन् एकच हशा पिकला; पाहा व्हिडीओ

सलमान खान आणि रोनाल्डोचा हा व्हिडीओ बॉलीवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान म्हणजेच केआरके ट्वीट केला आहे. या व्हिडीओत, बॉक्सिंग सामना संपल्यानंतर रोनाल्डो आपल्या गर्लफ्रेंडचा हात हातात घेऊन निघत असतो. तेव्हा समोर सलमान खान येतो. पण रोनाल्डो त्याला दुर्लक्ष करतो आणि पुढे निघून जातो. हा व्हिडीओ शेअर करत केआरकेने लिहीलं आहे, ‘एक जगप्रसिद्ध खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि एक बॉलीवूडमधला छोटा-मोठा अभिनेता.’

हेही वाचा – “…तर तुमची आडनावं मुल्ला, खान असती”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत म्हणाली…

केआरकेने शेअर केलेल्या या व्हिडीओवर सलमान चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. एका नेटकऱ्याने लिहीलं आहे, ‘रोनाल्डोने माफी मागितली पाहिजे.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं आहे, ‘सलमानला आता राग येईल.’ तसेच तिसऱ्याने लिहीलंय, ‘आता रोनाल्डचं करिअर संपलं.’ अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.

हेही वाचा – ‘द कपिल शर्मा शो’ फेम अभिनेत्री ३५व्या वर्षी होणार आई; महाराष्ट्रीय पद्धतीत थाटामाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

दरम्यान, सलमानचा ‘टायगर ३’ दिवाळीच्या मुहूर्तावर १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटात सलमानबरोबर कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ronaldo ignores bollywood actor salman khan video goes viral on social media pps