BJP MP Roopa Ganguly Arrested : भाजपाच्या माजी खासदार आणि अभिनेत्री रुपा गांगुली यांना बांसद्रोणी पोलीस ठाण्यासमोर रात्रभर ठिय्या आंदोलन केल्यानंतर गुरुवारी सकाळी कोलकाता पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
रुपा गांगुली यांना अटक नेमकं प्रकरण काय?
बुधवारी सकाळी ( २ऑक्टोबर ) कोलकाता येथे इयत्ता नववीमधील एक विद्यार्थी कोचिंग सेंटरला जात होता. याच परिसरात रस्त्याचं काम देखील चालू होतं. या विद्यार्थ्याला जेसीबीने धडक दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर बांसद्रोणी ( कोलकाता ) प्रभाग क्रमांक ११३ च्या स्थानिक नगरसेवक अनिता कर मजुमदार या परिसरात उपस्थित राहिल्या नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली. यानंतर रस्त्यावर निदर्शने सुरू झाली. यावेळी भाजप नेत्या रुबी मोंडल यांच्यासह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली. या निषेधार्थ बुधवारी रात्री रुपा गांगुली यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी बांसद्रोणी पोलीस स्थानक गाठलं.
हेही वाचा : Video : रीना दत्ताच्या वडिलांचे निधन, आमिरसह खान कुटुंबाने साश्रूनयनांनी दिला अखेरचा निरोप
रुपा गांगुली ( Roopa Ganguly ) यांनी पोलीस स्थानक गाठल्यावर, “रुबी मोंडलसह अन्य कार्यकर्त्यांना अटक केली मात्र, विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही” असे आरोप केले. तसेच विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी संबंधित आरोपींना अटक होईपर्यंत स्टेशन बाहेर बसून राहणार असंही त्या म्हणाल्या होत्या. या प्रकरणी रूपा गांगुली यांनी निषेध व्यक्त केला. बुधवारी रात्रीपासून त्या बांसद्रोणी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करत होत्या. यानंतर गुरुवारी सकाळी रुपा यांना अटक करण्यात आली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याप्रकरणी रूपा गांगुली ( Roopa Ganguly ) म्हणाल्या, “मी कोणालाही त्रास दिला नाही. मी कोणाच्याही कामात अडथळा आणला नाही. आरोपींनी ताब्यात घ्यावं यासाठी मी शांतपणे तिथे बसले होते.”
हेही वाचा : Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ फेम पूर्णा आजीने वयाच्या ६८ व्या वर्षी घेतली स्वत:ची गाडी! लेक तेजस्विनी आईबद्दल म्हणाली…
पश्चिम बंगाल भाजपाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार शमिक भट्टाचार्य म्हणाले, “रुपा यांनी बांसद्रोणीच्या घटनेचा निषेध केला. परंतु, राज्यातील तृणमूल सरकार टीका सहन करू शकत नाही. आणि म्हणूनच रूपा गांगुलीला ( Roopa Ganguly ) अटक करण्यात आली.”