एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ चित्रपटाचा जगभरात डंका वाजत आहे. नुकताच या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला गोल्डन ग्लोब्समध्ये अवॉर्ड मिळाला. सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाणं हा गोल्डन ग्लोब पुरस्कार ‘नाटू नाटू’ला देण्यात आला. आरआरआर चित्रपटातील या गाण्याला पुरस्कार मिळाल्यानंतर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

‘नाटू नाटू’ गाण्याला पुरस्कार मिळाल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी ट्वीट करत कलाकारांचं अभिनंदन केलं होतं. “तेलुगु ध्वज उंच फडकत आहे. RRR चित्रपटातील कलाकार व संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो. आम्हाला तुमचा अभिमान आहे”, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Image of BJP MLA T Raja Singh.
T Raja Singh : भाजपा आमदाराने भर कार्यक्रमात फाडला बांगलादेशचा ध्वज, गोव्यात नेमकं काय घडलं?
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : नाही तर ईडी, सीबीआय आहेतच!

हेही वाचा>>Video: राखी सावंतच्या लग्नाचा व्हिडीओ समोर, बॉयफ्रेंड आदिलला वरमाला घातली अन्…

मोहन रेड्डी यांनी ‘RRR’साठी केलेलं हे ट्वीट बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अदनान सामीला खटकलं आहे. रेड्डींच्या या ट्वीटवर त्याने रिप्लाय केला आहे. “तेलुगु ध्वज? तुम्हाला भारताचा ध्वज म्हणायचं आहे का? सर्वात आधी आपण भारतीय आहोत. देशापासून स्वत:ला वेगळं समजणं थांबवा. खरं तर, जागतिक स्तरावर आपण भारतीय आहोत. विभक्त करण्याचा विचार आपल्यासाठी घातक आहे. याची अनुभूती आपल्याला १९४७ मध्ये आलेली आहे”, असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अदनान सामीने केलेलं हे ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. त्याच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> “तीन वर्ष ज्या सैनिकांबरोबर…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींची खास पोस्ट

हेही वाचा>> ‘आरआरआर’च्या ‘नाटू नाटू’ला गोल्डन ग्लोब ; देशभरातून शुभेच्छांचा वर्षांव; सर्वोत्तम चित्रपटाचा सन्मान मात्र हुकला

गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळ्यात ‘RRR’ चित्रपटाचं प्रतिनिधीत्व दिग्दर्शक एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी केलं. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी १९२० मधील ब्रिटिशकालीन भारतातील स्वतंत्र सेनानी कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामाराजू यांच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यासह ब्रिटीश कलाकार रे स्टीवेन्सन, एलिसन डूडी आणि ओलिविया मॉरिस यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

Story img Loader