प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट निर्माते ज्युनियर मेहमूद यांना नोव्हेंबरमध्ये यकृत आणि फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत आहे. ज्युनियर मेहमूद यांनी मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावकर आणि ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र ज्यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सचिन पिळगावकर आणि ज्युनियर मेहमूद बालपणीचे मित्र आहेत. त्यांनी सचिन यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती इच्छा सचिन यांनी पूर्ण केली आहे.

चित्रपट निर्माते खालिद महमूद यांनी एक्सवर पोस्ट केली, त्यात लिहिलं, “ज्युनियर मेहमूद एकेकाळचे बाल-कलाकार कॅन्सरच्या चौथ्या टप्प्यात आहेत. त्याने जितेंद्र यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच त्यांना त्यांचे लहानपणीचे मित्र सचिन पिळगावकर यांनाही भेटायचं आहे. कृपया जितेंद्र साहेब व सचिनजी त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करा.” या पोस्टला सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रियाने उत्तर दिलं आणि सचिन मंगळवारी मेहमूद यांना भेटले असी माहिती दिली. “बाबा त्यांच्या संपर्कात आहेत आणि आज त्यांची भेट घेतली,” असं श्रिया म्हणाली.

Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
medha Patkar
समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises to mother in law
“माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”
woman dies in stampede during pushpa 2 movie
‘पुष्पा-२’ चित्रपटादरम्यान चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू
Doctor appointed as head of J J Hospitals nursing college
जे.जे. रुग्णालयाच्या परिचर्या महाविद्यालयाच्या प्रमुखपदी डॉक्टरची नियुक्ती
director of neeri atul vaidya appointed as vice chancellor of lit university
व्यक्तिवेध : डॉ. अतुल वैद्या
Opportunities in the field of radiation research at Mumbai University
मुंबई विद्यापीठात किरणोत्सर्ग संशोधन क्षेत्रात संधी!

ज्युनियर मेहमूद यांना कर्करोगाचे निदान झाल्याचं कळाल्यानंतर विनोदवीर जॉनी लिव्हर त्यांच्या भेटीसाठी गेले. त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्युनियर मेहमूद यांचे जवळचे मित्र सलाम काझी यांनी ‘एएनआय’शी बोलताना मेहमूद यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं. “ते दोन महिन्यांपासून आजारी होते. सुरुवातीला आम्हाला वाटलं की त्यांना एखादा किरकोळ आजार असेल पण त्यानंतर अचानक त्यांचे वजन कमी होऊ लागले. त्यांचे मेडिकल रिपोर्ट आल्यावर उघड झालं की त्यांना कर्करोग झाला आहे. त्यांच्या यकृत आणि फुफ्फुसात कर्करोग आणि आतड्यात एक गाठ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच त्यांना कावीळही झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू आहेत, पण डॉक्टरांनी सांगितलं की कॅन्सर चौथ्या टप्प्यावर आहे.”

ज्युनियर मेहमूद आणि सचिन पिळगावकर यांनी बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. या दोघांनी ‘बचपन’, ‘गीत गाता चल’ आणि ‘ब्रह्मचारी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. ज्युनियर मेहमूद यांनी जितेंद्रबरोबर ‘सुहाग रात’, ‘कारवां’, ‘सदा सुहागन’सह आणखी काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

नईम सय्यद हे ज्युनियर मेहमूद या नावाने प्रसिद्ध आहेत. ज्युनियर मेहमूद हे नाव त्यांना मेहमूद अली यांनी दिले होते. त्यांनी ७ वेगवेगळ्या भाषांमधील तब्बल २६५ चित्रपटांमध्ये काम केलं असून ६ मराठी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले आहे.

Story img Loader