बॉलिवूड अभिनेत्री क्रिसन परेराला UAE(संयुक्त अरब अमिरात) मध्ये अटक करण्यात आली आहे. ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी क्रिसनला अटक करण्यात आली असून शारजाह सेंट्रल तुरुंगात तिची रवानगी करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
क्रिसनला अटक केल्याची माहिती भारतीय दुतावासाकडून तिच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. क्रिसन निर्दोष असून तिला या प्रकरणात गोवण्यात आल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं असल्याची माहिती ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिली आहे. “मागील दोन आठवड्यांपासून आम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. माझी बहीण निर्दोष असून तिला ड्रग्ज रॅकेजमध्ये अडकवण्यात आलं आहे,” अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या भावाने दिली आहे.
हेही वाचा>> लग्नासाठी कसा मुलगा हवा? समृद्धी केळकरने वाचला अटींचा पाढा, म्हणाली “मला कुत्र्यांवर…”
क्रिसनच्या कुटुंबीयांनी रवी नावाच्या एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे. या व्यक्तीने क्रिसनची आई प्रेमिला परेरा यांना मेसेज करून “क्रिसन इंटरनॅशनल वेब सीरिज करण्यासाठी तयार आहे का?” असं विचारलं होतं. त्यानंतर दुबईला ऑडिशन देण्यासाठी क्रिसनसाठी जाण्यास सांगण्यात आलं होतं. १ एप्रिलला क्रिसन दुबईसाठी निघण्याच्या पूर्वी त्या व्यक्तीने तिला मुंबई विमानतळापासून १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका कॉफी शॉपमध्ये भेटण्यासाठी बोलवलं होतं. त्या व्यक्तीने क्रिसनला एक ट्रॉफी देत ती ऑडिशनसाठी महत्त्वाची असल्याचं सांगितलं. त्याच ट्रॉफीत मिळालेल्या ड्रग्ज प्रकरणात क्रिसनला अटक करण्यात आल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
क्रिसनची या प्रकरणातून सुटका करण्यासाठी तिचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. “दुबईमधील एका वकीलाशी आमचं बोलणं झालं आहे. त्यांची फी १३ लाख रुपये आहे. जामीनासाठी किती पैसे लागतील, हेही आम्हाला ठाऊक नाही. २०-४० लाख रुपये जामिनावर सुटका करण्यासाठी लागू शकतात, अशी आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही घर गहाण ठेवण्याचा विचार करत आहोत. १३ दिवसांपेक्षा जास्त उशीर झाला तर अडचणी वाढू शकतात,” असंही क्रिसनचा भाऊ म्हणाला.
कोण आहे क्रिसन परेरा?
क्रिसन परेरा ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने सडक २, बाटला हाऊस, थिंकीस्तान यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. क्रिसन सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिचे इन्स्टाग्रामवर १२ हजारांहून जास्त फॉलोवर्स आहेत.