अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी लग्न केलं आहे. तिच्या आंतरधर्मीय लग्नावरून तिला खूप ट्रोल केलं गेलं. अशातच आता विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. स्वरा भास्करने श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे कदाचित पाहिले नसावेत, असं साध्वी प्राची यांनी म्हटलं आहे.
साध्वी प्राची नुकत्याच बरेलीला गेल्या होत्या. तिथे मीडियाशी बोलताना त्यांनी स्वरा भास्करवर निशाणा साधला. “स्वरा याआधीही हिंदुविरोधी वक्तव्य करत होती. आता तिने फहाद अहमदशी लग्न करून ती हिंदुविरोधी असल्याचे सिद्ध केले आहे. कदाचित तिला फ्रीज आणि सुटकेसमध्ये ठेवलेले श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे दिसले नसावेत,” असं म्हणत साध्वी प्राचींनी स्वरावर टीका केली.
साध्वी प्राची पुढे म्हणाल्या, “जर स्वराने श्रद्धाचे तुकडे पाहिले असते तर कदाचित तिने फहाद अहमदबरोबर लग्न केलं नसतं. स्वराबरोबर श्रद्धासारखी घटना केव्हाही होऊ शकते. तसेच लवकरच मीडियाला स्वरा व फहाद घटस्फोटाची बातमी मिळेल.”
दरम्यान, स्वराने फहादला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भाऊ म्हटलं होतं. त्यावरही साध्वी प्राचींनी प्रतिक्रिया देतहा तुमचा भाऊ आहे’ असं म्हटलं होतं.
स्वरा व फहादने जानेवारी महिन्यात नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी १६ फेब्रुवारीला साखरपुडा केला. आता मार्च महिन्यात ते थाटामाटात लग्न करणार आहेत.