सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७५ वर्षांचे होते. सहारा कुटुंबाचे प्रमुख सुब्रतो रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रविवारी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक वर्षांपासून लोकांचे पैसे न दिल्याने सहारा इंडियाविरुद्ध पाटणा उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. लोकांनी हे पैसे कंपनीच्या अनेक योजनांमध्ये गुंतवले होते.

मात्र नंतर याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून सहाराश्रींना मोठा दिलासा मिळाला. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने पाटणा उच्च न्यायालयाच्या अटकेच्या आदेशावर तात्काळ सुनावणी करून स्थगिती दिली होती. तसेच त्यांच्यावर पुढील कारवाईबाबत स्थिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सुब्रतो रॉय यांच्यावरही असाच एक खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ते सध्या जामिनावर बाहेर होते. केवळ उद्योगविश्वातच नव्हे तर चित्रपटसृष्टीतील कित्येक बड्या सेलिब्रिटीजबरोबर सहाराश्री यांचे सलोख्याचे संबंध होते.

Dhananjay Munde on Namdev Shastri Maharaj
Dhananjay Munde : महंत नामदेव शास्त्री महाराजांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर धनंजय मुंंडेंनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “इतकी मोठी शक्ती…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Chhaava
जेव्हा विकी कौशलला पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांच्या पेहरावात पाहिलं तेव्हा…; अभिनेता संतोष जुवेकर म्हणाला, “कोणी गोरागोमटा…”
Image Of Saif Ali Khan And Bhajan Singh.
Saif Ali Khan : रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षाचालकाला सैफने मारली मिठी, भजन सिंग म्हणाले, “इतक्या मोठ्या स्टार्सना…”
Pirticha Vanva Uri Petla fame Indraneil Kamat meet tejashri Pradhan photo viral
‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ फेम इंद्रनील कामतची तेजश्री प्रधानबरोबर ग्रेट भेट, अभिनेता फोटो शेअर करत म्हणाला, “तू खूप दयाळू…”
Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra share emotional birthday wish to sushant singh rajput
‘बिग बॉस १८’चा विजेता करणवीर मेहराला सुशांत सिंह राजपूतची आली आठवण, भावुक पोस्ट करत म्हणाला…
Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra Talk About Sidharth Shukla
“मनाने खूप मोठा माणूस…”, सिद्धार्थ शुक्लाशी तुलना करण्यावरून करणवीर मेहराचं वक्तव्य; जुनी आठवण सांगत म्हणाला, “त्याची महागडी बाईक…”

आणखी वाचा : “विदेशी आईच्या पोटी जन्मलेला…” राहुल गांधींबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर मनोज मुंतशीर यांनी दिलं स्पष्टीकरण

असं सांगितलं जातं की सुब्रतो रॉय आणि बॉलिवूडचे महानायक यांचे फार चांगले संबंध होते, इतकंच नव्हे तर बिग बी यांना त्यांच्या पडत्या काळात सुब्रतो रॉय यांनी मदतही केल्याचं सांगितलं जातं. राजकीय नेते अमर सिंह यांनी बिग बी आणि सहाराश्री यांची भेट घडवून आणल्याचं सांगितलं जातं आणि त्यानंतरच त्यांच्यात मैत्री झाली. मीडिया रीपोर्टनुसार जेव्हा अमिताभ आर्थिक अडचणीत होते तेव्हा धीरूभाई अंबानी यांच्याबरोबरच सुब्रतो रॉय यांनीही मदतीचा हात पुढे केला होता.

१९९० ते २००० यादरम्यान चित्रपट फ्लॉप होणे आणि दिवाळखोरी अशा वेगवेगळ्या संकटांचा सामना करत असताना बिग बी यांना बऱ्याच नेत्यांनी आणि उद्योगपतींनी मदतीचा हात पुढे केला होता. १९७८ मध्ये व्यवसाय सुरू करत सुब्रतो रॉय यांनी ‘सहारा इंडिया’चा प्रवास सुरू केला. २०१२ मध्ये इंडिया टूडेच्या रीपोर्टनुसार सुब्रतो रॉय यांचे नाव भारतातील सर्वात १० श्रीमंत लोकांमध्ये घेतले गेले होते. सुब्रतो रॉय यांच्या निधनामुळे विविध क्षेत्रातील लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Story img Loader