दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाने ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा हा पहिला हिंदी चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला. त्यानंतर आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी सज्ज झाली आहे. आमिर खानचा लेक जुनैद खानसह साई बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.

काही दिवसांपूर्वी साई पल्लवी व जुनैद खानच्या चित्रपटाच्या जपानमधील चित्रीकरणा दरम्यानचे काही फोटो व्हायरल झाले होते. ज्यामध्ये दोघं विंटर लूकमध्ये पाहायला मिळाले होते. आता साई व जुनैदच्या आगामी चित्रपटाचं जपानमधील चित्रीकरण पूर्ण झाले असून एका पार्टीचा व्हिडीओ समोर आला आहे.

Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
Virat Kohli Shouts At Mohammed Siraj who is Talking to Marnus Labuschagne Said Dont Talk To Them Laughingly Video
VIDEO: “यांच्याबरोबर हसत बोलू नकोस…”, लबूशेनबरोबर बोलताना पाहून विराट कोहली सिराजला ओरडला, मैदानात नेमकं काय घडलं?

हेही वाचा – एल्विश यादवने मारहाण केलेल्या युट्यूबरने व्हिडीओतून सांगितला घडलेला प्रकार, घटनाक्रम सांगत म्हणाला, “हरियाणा सरकार गुन्हेगाराला…”

‘बॉलीवूड नाउ’ या इन्स्टाग्राम पेजवर पार्टीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये साई पल्लवी कंगना रणौतचं ‘लंडन ठुमकदा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. साईच्या या व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – तितीक्षा तावडेचा पती बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर झळकणार, सिद्धार्थ बोडकेचा व्हिडीओ आला समोर

दरम्यान, साईच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती रणबीर कपूरसह ‘रामायण’ या चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चित्रपटात ती सीतेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Story img Loader