लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी लवकरच नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’मध्ये सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची, तर रवी दुबे लक्ष्मणची भूमिका साकारणार आहे. या सिनेमासाठी रणबीर कपूरने मांसाहार सोडल्याचे वृत्त आले होते. आता साई पल्लवीबाबत अशीच माहिती समोर आली आहे. त्यानंतर साई पल्लवीने त्यावर नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साई पल्लवीने ‘रामायण’ चित्रपटासाठी मांसाहार सोडला आहे, अशा बातम्या आल्या होत्या. पण अशा बातम्यांवर तिने नाराजी व्यक्त केली आहे. यापुढे अशा प्रकारच्या अफवांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा तिने दिला आहे. साई पल्लवीने बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट केली. ‘रामायण’मध्ये सीतेची भूमिका साकारण्यासाठी ती शाकाहारी झाल्याची एक बातमी होती, त्यावर तिने उत्तर दिलं.

हेही वाचा – नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून

“जेव्हा मी अशा खोट्या, निराधार, बनावट गोष्टी पाहते तेव्हा मी बऱ्याचदा, किंबहुना प्रत्येक वेळी गप्प राहते. पण, आता मात्र मी प्रतिक्रिया देण्याची वेळ आली आहे. कारण, सातत्याने या गोष्टी घडत आहेत. खासकरून माझे चित्रपट रिलीज होताना, चित्रपटांची घोषणा होताना किंवा माझ्या करिअरमध्ये काही चांगल्या गोष्टी घडत असताना, असं होतं. त्यामुळे यापुढे कोणतीही प्रतिष्ठित व्यक्ती, मीडिया किंवा कोणीही बातम्या किंवा गॉसिपच्या नावाखाली माझ्या बाबतीत अशा गोष्टी छापल्या तर मी कायदेशीर कारवाई करेन,” असं साई पल्लवीने लिहिलं.

हेही वाचा – “मी तिला झापड मारली”, अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग; म्हणाले “ती संतापली होती”

साई पल्लवीची पोस्ट

साई पल्लवीची पोस्ट (फोटो – इन्स्टाग्राम)

विशेष म्हणजे, सई पल्लवी शाकाहारीच आहे. तिने अनेकदा मुलाखतीत ती शाकाहारी असल्याचं सांगितलंय. “मी शाकाहारी आहे. मी एखादा जीव मरताना पाहू शकत नाही. मी दुसऱ्या व्यक्तीला दुखावू शकत नाही,” असं साई पल्लवी म्हणाली होती.

हेही वाचा – ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

साई पल्लवीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची तमिळ चित्रपट ‘अमरन’मध्ये दिसली होती. मेजर मुकुंद वरदराजन यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात तिने इंदू ही भूमिका केली होती. या चित्रपटात शिवकार्तिकेयन मेजर मुकुंद वरदराजनच्या भूमिकेत होता. यामध्ये राहुल बोस आणि भुवन अरोरा यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. आता साई पल्लवी नितेश तिवारीच्या ‘रामायण’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, रवी दुबे, सनी देओल आणि कन्नड सुपरस्टार यश देखील आहेत. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai pallavi gets angry after reading that she turned vegetarian for nitesh tiwari ramayana movie hrc