Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकर कायम चर्चेत असते. हास्यजत्रा असो, वेब सीरिज असो किंवा तिचा चित्रपट असो सईची चर्चा कायमच होते. तसंच पुढच्या महिन्यात सईची मानवत मर्डर्स ही वेब सीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या ब्रेक अपची चर्चाही चांगलीच रंगली होती. त्यामुळे ती व्यक्तिगत आयुष्यामुळेही चर्चेत असते. नातेसंबंध आणि तिचं कामाचं स्वरुप याबाबत सईने ( Sai Tamhankar ) तिची थेट मतं मांडली आहेत.

मानवत मर्डर्स बाबत सई काय म्हणाली?

मानवत मर्डर्स ही वेबसीरिज महाराष्ट्रातल्या मानवत हत्याकांडावर आधारित आहे. ही वेबसीरिज एका पुस्तकावर बेतली आहे. हे पुस्तक अशा पोलीस अधिकाऱ्याचं आहे ज्या अधिकाऱ्याने कधीही हात उचललेला नाही. त्यांच्या पुस्तकावर ही वेबसीरिज आहे. मराठीत असे विषय कमी आणले जातात, मला एका स्टेलर स्टारकास्टचा भाग होता आलं याचा आनंद आहे. मकरंद अनासपुरे, आशुतोष गोवारीकर, सोनाली कुलकर्णी या सगळ्यांबरोबर काम करताना मला खूपच मजा आली. आशिष बेंडे यांनी या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. सगळे मित्रही आहेत, शूट करताना खूप मजा आली असं सईने ( Sai Tamhankar ) सांगितलं. मुंबई तकच्या चावडी या कार्यक्रमात तिने हे वक्तव्य केलं. समिंद्री नावाचं पात्र मी या वेब सीरिजमध्ये साकारते आहे. याचा लहेजा थोडा वेगळा आहे. काहीसा रिसर्च करुन मी अशा लूकमध्ये पहिल्यांदा समोर येते आहे. ती तशीच दिसते आहे, मी आता लोकांकडून काय प्रतिक्रिया येतात याची वाट पाहते आहे. असं सई ताम्हणकरने ( Sai Tamhankar ) म्हटलं आहे.

Sunil Tatkare
Sunil Tatkare : “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून…”; अमित शाह-शरद पवार भेटीनंतर सुनील तटकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

हे पण वाचा- Sai Tamhankar : सई ताम्हणकरच्या फोटोंवर चाहत्याची कमेंट चर्चेत,”लाखात एक..”

बोल्ड या विशेषणाबाबत सईला काय वाटतं?

बोल्ड सई याबाबत काय वाटतं असं विचारलं असता सई म्हणाली, “घिसपटं, बोथट असं वाटतं, मी विचारांनी बोल्ड आहे. माझ्या हातून काही काम घडलं नाहीये का नवं विशेषण सापडायला? की लोकांची डिक्शनरी कमी पडते आहे? असे दोन प्रश्न मला पडतात.” असं सई ( Sai Tamhankar ) म्हणाली.

Sai Tamhankar News
सई ताम्हणकरने बोल्ड या विशेषणाबाबत काय वाटतं यावरही भाष्य केलं आहे. (फोटो सौजन्य-सई ताम्हणकर, इंस्टाग्राम पेज)

नातेसंबंधांबाबत काय म्हटलं आहे सईने?

“मी भावनिकदृष्ट्या स्थिरावण्याचा विचार नक्कीच केला आहे. पण स्थिरावणारी व्यक्ती नाही. मी एका जागी शांत बसू शकत नाही असा माझा स्वभाव आहे. स्थिरावणं मला जमणार नाही. पण भावनिकदृष्ट्या मला स्थिरावणं आवडेल. सध्या तसे काही प्रयत्न सुरु नाहीत, पण असं वाटतं की सहा ते सात महिन्यात मी करेन तसं काही प्रयत्न. नातं कॉम्प्लेक्स असतं, त्याला खूप पदर असतात. जेवढे पुढे जाल तितक्या नव्या गोष्टी समोर येतात. गुंतागुंती हा नातेसंबंधांचा भाग आहे. पण नात्यांमध्ये पारदर्शकता हवी, आदर हवा, योग्य प्रकारचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. आर्थिक स्वातंत्र्य किंवा एक व्यक्ती म्हणून स्वातंत्र्य हवं असतं. मी असे नातेसंबंध पाहिलेत ज्यात एक पार्टनर दुसऱ्याला विचारतो की मला सोलो ट्रिपला जायचं आहे त्यावर दुसरी व्यक्ती विचारते की का? अशी का ? विचारणारी माणसं मला नको.” असं सईने सांगितलं.

Story img Loader