Amrita Singh buys luxury apartment : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री व अभिनेता सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंहने मुंबईतील जुहू येथे एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. या अपार्टमेंटसाठी तिने कोट्यवधी रुपये मोजले आहेत. गेल्यावर्षीही तिने मुंबईत प्रॉपर्टी खरेदी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिने मुंबईत अपार्टमेंट घेतले आहे. या अपार्टमेंटची किंमत किती, ते जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशनच्या (IGR) वेबसाइटवरील कागदपत्रांनुसार, अमृता सिंहने फेब्रुवारी २०२५च्या सुरुवातीला अपार्टमेंट खरेदी केलं. या अपार्टमेंची किंमत तब्बल १८ कोटी रुपये आहे. ‘स्क्वेअर यार्ड्स’नुसार, अमृताचे लग्झरी अपार्टमेंट पेनिनसुला बिल्डिंगमध्ये आहे.

तब्बल ९० लाख रुपये स्टॅम्प ड्युटी

अमृताने ज्या बिल्डिंगमध्ये हे अपार्टमेंट खरेदी केले, ती बिल्डिंग नूतन लक्ष्मी कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत आहे. या अपार्टमेंटचे क्षेत्रफळ २७१२.९ चौरस फूट आहे. तसेच यामध्ये तीन कार पार्किंगची जागा आहे. हे मूव्ह इन अपार्टमेंट आहे. रिपोर्ट्सनुसार, अमृता सिंहने जुहू येथील या अपार्टमेंटसाठी ९० लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली. तसेच तिने ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरले.

अमृता सिंहने मागील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली होती. तिने अंधेरी पश्चिम येथे २२.२६ कोटी रुपयांची दोन कार्यालये खरेदी केली होती. तिने वीरा देसाई रोडवर असलेल्या सिग्नेचर बिल्डिंगमध्ये वीर सावरकर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ही कार्यालये खरेदी केली होती. याच बिल्डिंगमध्ये अमृताने २०२३ साली चौथ्या मजल्यावर दुसरे ऑफिस घेतले होते. त्यासाठी तिने तब्बल ९ कोटी रुपये मोजले होते.

अमृता सिंह ही आता फार चित्रपट करत नाही. ती अनेक वर्षांपासून चित्रपट आणि अभिनयापासून दूर आहे, परंतु भरपूर गुंतवणूक करत आहे. अमृताची मुलगी सारा अली खान ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तसेच लवकरच अमृताचा मुलगा व साराचा भाऊ इब्राहिम अली खान बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या दोन्ही भावंडांच्या कमाईतूनही अमृता गुंतवणूक करत आहे. अमृता मुलगा इब्राहिम व साराबरोबर राहते. तर तिचा पूर्वाश्रमीचा पती सैफ अली खानने करीना कपूरशी दुसरं लग्न केलं. तो करीना व दोन्ही मुलांबरोबर वांद्रे येथे राहतो.