महेश मांजरेकरांची लाडकी लेड सई मांजरेकरने २०१९ मध्ये ‘दबंग ३’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. सईचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. अभिनेत्री तिच्या दैनंदिन दिनक्रमाबाबत बऱ्याच गोष्टी इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. दरम्यान, अलीकडेच सईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “मेकअप का केलास, चेहरा धुऊन ये” प्रिया बापटने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “मुन्नाभाई MBBS चित्रपट करताना…”

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा

सई मांजरेकरचा हा व्हिडीओ ‘फिल्मीग्यान’ या पापाराझी पेजवर शेअर करण्यात आला आहे. मुंबईत एका फुगेवाल्याच्या कुटुंबियांनी सईकडे फोटोसाठी मागणी केली. यावेळी सईने त्यांच्याबरोबर फोटो काढून त्यांची अगदी प्रेमाने विचारपूस करीत हस्तांदोलन केले. अभिनेत्रीची ही कृती पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केली आहे. तिचा साधेपणा नेटकऱ्यांना फारच भावला असून त्यांनी या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करीत अभिनेत्रीचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : वाढदिवसानिमित्त मितालीने शेअर केला सिद्धार्थ चांदेकरचा ‘तो’ मजेशीर फोटो; अभिनेत्याला व्हिडीओ कॉलवर दिल्या शुभेच्छा!

सई मांजरेकरचे कौतुक करीत एका युजरने लिहिले आहे की, “ही खूप चांगली मुलगी आहे.” तर दुसऱ्या एका युजरने “सई महेश मांजरेकरांची मुलगी असल्याने तिच्यावर फार चांगले संस्कार करण्यात आले आहेत” तसेच आणखी एका नेटकऱ्याने “सई मराठी मुलगी आहे म्हणून ती एवढी समजूतदारपणे वागत आहे.” अशा कमेंट अभिनेत्रीच्या व्हायरल व्हिडीओवर केल्या आहेत.

दरम्यान, सईने २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दबंग ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने अभिनेता सलमान खानच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. हिंदीच्या बरोबरीने सईने तेलगू चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवला आहे.

Story img Loader