Saif Ali Khan Amrita Singh Love Story : करीना कपूरबरोबर लग्न करण्याआधी सैफ अली खानने अमृता सिंगशी लग्न केले होते. लग्नाच्यावेळी सैफ अली खान केवळ २१ वर्षांचा होता, तर अमृता सिंग ३४ वर्षांची होती. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या लग्नाची त्या काळात खूप चर्चा झाली होती. सैफ अली खानने नंतर एका मुलाखतीत त्याच्या लग्नाचा किस्सा सांगितला होता. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी पहिल्याच डिनर डेटनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘रँडेजवूस विथ सिमी गरेवाल’ या कार्यक्रमात सैफ आणि अमृताने त्यांच्या प्रेमकथेचे किस्से सांगितले होते, ज्यात त्यांनी त्यांची फोटोशूटमध्ये झालेली पहिली भेट, डिनर डेट आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा घेतलेला निर्णय यावर भाष्य केले होते.

हेही वाचा…घटस्फोटानंतर चांगली जोडीदार होण्यासाठी सल्ला देणाऱ्या आमिर खानला किरण राव म्हणाली, “मी…”

सैफ आणि अमृताची पहिली भेट राहुल रवैलच्या चित्रपटाच्या सेटवर झाली होती, हा सैफचा पहिला चित्रपट होता. राहुल अमृताचा चांगला मित्र होता, त्याने तिला फोटोशूटसाठी यायला आमंत्रित केले. फोटोशूटदरम्यान, सैफने धाडसाने अमृताच्या खांद्यावर हात ठेवला आणि फोटो काढला. सैफच्या या कृतीमुळे अमृताचे त्याच्याकडे लक्ष गेले.

काही दिवसांनी सैफने (Saif Ali Khan) अमृताच्या (Amruta Singh) घरच्या फोनवर कॉल केला आणि तिला डिनरला जाण्यासाठी विचारले. सैफ किस्सा सांगत म्हणाला होता, “मी तिला विचारले, ‘तू माझ्याबरोबर डिनरला येशील का?’ पण तिने उत्तर दिले की, ‘नाही, मी बाहेर डिनरला जात नाही.’ मग तिने सांगितले, ‘तू माझ्या घरी डिनरसाठी येऊ शकतोस.”

हेही वाचा…२३ वर्षीय बॉलीवूड अभिनेत्रीने घेतली हॉलीवूड स्टार टॉम क्रूझची भेट, पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव, म्हणाले…

त्या डिनर डेटबद्दल आठवण काढताना सैफने सांगितले होते की, “त्या संध्याकाळी आम्ही एकमेकांना किस केले. अमृताने याच पुढे सांगितले होते की, “तो दोन दिवस माझ्याकडे राहिला, त्यानंतर त्याला शूटसाठी जावे लागले. त्याने माझ्याकडे पहिल्यांदा शंभर रुपये मागितले, कारण त्याच्याकडे पैसे नव्हते, म्हणून मी त्याला माझी कार ऑफर केली. पण सैफ म्हणाला की, प्रॉडक्शनची गाडी त्याची वाट बघत आहे, म्हणून त्याला माझी कार नको होती.” अमृताने सैफला आग्रह केला, “नाही, गाडी घेऊन जा. निदान तू कार परत करायला पुन्हा येशील.”

सैफ आणि अमृताने या मुलाखतीत त्यांनी गुपचूप केलेल्या लग्नाचा किस्सादेखील सांगितला होता. त्यावेळी त्यांनी त्यांच्या पालकांना काहीच कल्पना न देता लग्न केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सैफने त्याच्या आई, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांना फोन करून ही बातमी दिली. “माझ्या आईला आमच्या नात्याबद्दल माहीत होते, पण ती मला नेहमी म्हणायची, ‘माझी इच्छा आहे की तू आपल्या नात्यात आनंदी राहावास, पण लग्न करू नकोस.’ ” असे सैफ अली खानने सांगितले होते.

हेही वाचा…अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”

लग्नानंतर शर्मिला यांच्याशी पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना अमृता म्हणाली होती, “त्या भेटीत मी थोडी तणावात होते. शर्मिला यांनी सैफला बाहेर फिरायला पाठवले आणि मला समज दिली.”

हेही वाचा…दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे

सैफ आणि अमृताचे लग्न १३ वर्ष टिकले. त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत. अमृतापासून विभक्त झाल्यानंतर सैफने करीना कपूरबरोबर लग्न केले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan and amrita singh love story they secretly did marriage did not tell parents psg