Saif Ali Khan and Kareena Kapoor : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन अमेरिकेहून सुट्टी एन्जॉय करून लेक आराध्यासह मुंबईत परतल्याचं पाहायला मिळालं. यासंबंधिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर आता बॉलीवूडमधील प्रसिद्ध पतौड कुटुंब युरोपमधील सुट्टी एन्जॉय करून परतलं आहे. महिन्याभरापूर्वी सैफ अली खान व करीना कपूर आपल्या मुलांसह युरोपमध्ये गेले होते. मोठी सुट्टी एन्जॉय करून आज सैफ-करीना मुंबईत परतले आहेत. मुंबई विमानतळावरील त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सैफ अली खान व जेहच्या एका व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

युरोपमध्ये महिन्याभराची सुट्टी एन्जॉय करून आल्यानंतर मुंबई विमानतळावर करीना कपूर काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये पाहायला मिळाली. तर सैफ अली खानचा डॅशिंग अंदाजात दिसला. त्याने ग्रे टी-शर्टबरोबर फिकट निळ्या रंगाची डेनिम जीन्स परिधान केली होती. याशिवाय करीना व सैफची दोन मुलं म्हणजे तैमूर व जेह पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये पाहायला मिळाले. यावेळी सैफ धाकटा लेक जेहबरोबर मस्ती करताना दिसला.

Saif Ali Khan House Help Video
हाताला पट्टी अन् कपड्यांवर रक्ताचे थेंब, सैफ अली खानबरोबर हल्ल्यात जखमी झालेल्या मदतनीसचा Video Viral
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Saif Ali Khan attacker identified says police
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांची माहिती; चोरटा घरात नेमका कसा शिरला? जाणून घ्या
Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
kareena kapoor at lilavati hospital video viral
सैफ अली खानला भेटायला पोलिसांबरोबर रुग्णालयात पोहोचली करीना कपूर खान, Video Viral
kareena Kapoor video last night from recidence after the incident
Video: पतीवर झालेल्या हल्ल्याने करीना कपूर चिंतेत; घटनेनंतर घराबाहेरील पहिला व्हिडीओ आला समोर
Encounter Specialist Daya Nayak Arrives at Saif Ali Khan home
Video: एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक पोहोचले सैफ अली खानच्या घरी, तपासाचा व्हिडीओ आला समोर
Saif Ali Khan

हेही वाचा – इंग्रजी भाषा, ब्रशवाला माइक अन् रिमा लागूंना पाहिल्यानंतरची प्रतिक्रिया, मधुराणी प्रभुलकरने सांगितले ‘नवरा माझा नवसाचा’मधील किस्से

‘फिल्मी ग्नान’ व ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर सैफ अली खान ( Saif Ali Khan ) व करीना कपूर यांचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सैफ अली खान जेहला उचलून त्याच्याशी मस्ती करताना दिसत आहे. सैफच्या या कृतीने सध्या सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “हँडसम डॅड.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “जेह आज खूप आनंदी दिसतो.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “करीना खूप सुंदर दिसत आहे. व्वा.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “सनग्लासेसेमध्ये करीनाला कोणीही टक्कर देऊ शकत नाही.”

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील नव्या मिहिकाने खऱ्या आयुष्यातील नवऱ्यासाठी केली खास पोस्ट, म्हणाली, “तू अल्लड आणि निर्मळ…”

सैफ व करीनाच्या आगामी चित्रपटाबद्दल जाणून घ्या…

दरम्यान, सैफ अली खान ( Saif Ali Khan ) व करीना कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सैफ गेल्या वर्षी ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात शेवटचा दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. आता लवकरच सैफ ( Saif Ali Khan ) ज्युनियर एनटीआरबरोबर ‘देवरा: १’ चित्रपटात झळकणार आहे. तसंच करीनाचा मार्च महिन्यात ‘क्रू’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात करीना कृति सेनन आणि तब्बूबरोबर झळकली होती. तिघींच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’मध्ये करीना पाहायला मिळणार आहे.

Story img Loader