Saif Ali Khan Knife Attack Case Accused Arrested : सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या मध्यरात्री वांद्रे येथील निवासस्थानी चाकू हल्ला झाल्याची घटना घडली होती. दरोडेखोराने अभिनेत्यावर चाकूने सहा वार केले होते. या घटनेनंतर सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात होतं. तर, दुसरीकडे मुंबई पोलीस याप्रकरणी आरोपीचा शोध घेत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शनिवारी मध्यरात्री, मुंबई पोलिसांनी सैफच्या आरोपीला ठाणे येथून ताब्यात घेतलं. यानंतर त्याला पुढील तपासासाठी खार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं होतं. आरोपीला अटक केल्यावर मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचं नाव, तसेच प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी घुसखोर असावा असा संशय व्यक्त केला आहे.

आरोपीचं नाव काय?

“सैफ अली खानवर हल्ला आणि चोरीचा प्रयत्न या अनुषंगाने आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. या आरोपीचं नाव मोहोम्मद शरीफूल इस्लाम शहजाद असं आहे. तो ३० वर्षांचा आहे. हा आरोपी चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरी शिरला होता. त्याच दरम्यान ही घटना घडली. आता यानंतर त्याला न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडीची मागणी केली जाईल. मग, पुढील तपास केला जाईल.” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

“प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरीक असावा असा आम्हाला संशय आहे. अटक केल्यावर त्याची चौकशी करण्यात आली. त्याची उत्तरं आणि त्याच्याकडे जे काही साहित्य मिळालंय त्यावरुन आम्हाला तो बांगलादेशी असल्याचा संशय आहे. कारण, त्याच्याकडे भारतीय नागरिक असल्याचा कोणताही अधिकृत पुरावा नाही. भारतात आल्यावर त्याने आपली ओळख बदलली, विजय दास असं त्याने आपलं नाव सांगितलं होतं. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून तो मुंबईत आहे. तो हाऊसकिपिंग एजन्सीमध्ये काम करत होता. सदर आरोपीला ठाणे येथून अटक करण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.” असंही पोलिसांनी नमूद केलं आहे.

नेमकं काय घडलेलं?

गुरुवारी पहाटे २ ते २:३० च्या सुमारास सैफ अली खानच्या राहत्या घराच्या ११ व्या मजल्यावर दरोडेखोर शिरला. यावेळी सैफने आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी या हल्लेखोराचा सामना केला. सैफवर चाकूने सहा वार करण्यात आले याशिवाय अभिनेत्याच्या घरातील मदतनीस सुद्धा यात जखमी झाली होती. रक्तबंबाळ अवस्थेत सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या मते, सैफची प्रकृती स्थिर असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नाही.