अभिनेता सैफ अली खान काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. गुरुवारी पहाटे (१६ जानेवारी) सैफ अली खान घरात एक अज्ञात व्यक्ती घुसली होती. त्यानंतर झालेल्या झटापटीत अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली. आता पाच दिवसांच्या उपचारानंतर सैफ अली खान घरी परतला आहे. अभिनेता घरी परत येतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा पुढील तपास कोण करणार?

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. आता अभिनेत्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा तपास आतापर्यंत पोलिस अधिकारी सुदर्शन गायकवाड करीत होते. आता त्यांच्याऐवजी अजय लिंगनूरकर या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

सैफ अली खानवर हल्ला करणारी व्यक्ती बांगलादेशी नागरिक आहे. त्याचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम ऊर्फ ​​विजय दास, असे आहे. त्याला रविवारी ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात तो शिरला होता, असे त्याने कबूल केले आहे. याआधी त्याने कोलकातामधील रहिवासी असल्याचे म्हटले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सैफच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या या आरोपीने याआधी इतर बॉलीवूड कलाकारांच्या घरांतही घुसण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्याला यश मिळू शकले नाही.

बॉलीवूड अभिनेत्यावर हल्ला झाल्यानंतर कलाविश्वासह राजकीय वर्तुळातूनदेखील अनेकविध प्रतिक्रिया उमटल्याचे दिसले होते. दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआरने हल्ल्याची बातमी ऐकल्यानंतर धक्का बसल्याचे म्हटले होते. पूजा भट्टने याआधी कधीही इतके असुरक्षित वाटले नव्हते, अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती. तर, अनेकांनी सैफ अली खान बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केल्या होत्या. नुकत्याच एका कार्यक्रमात अक्षय कुमारने कुटुंबाच्या संरक्षणासाठी सैफने जे काही केले, त्यासाठी त्याला सलाम आहे, असे म्हटले. त्याबरोबरच तो खूप धाडसी असल्याचेदेखील म्हटले.

दरम्यान, सैफ अली खान नुकताच लीलावती रुग्णालयातून घरी परतला आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यावेळी तो दवाखान्यातून परत आला त्यावेळी कडक सुरक्षेत परतल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. यावेळी त्याच्या हाताला पट्टी बांधलेली दिसली. त्याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्याच्या मानेला व मणक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती.