Saif Ali Khan Attacked News : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री २.३० च्या सुमारास चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. सध्या अभिनेत्यावर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अज्ञात दरोडेखोर सैफच्या वांद्रे (पश्चिम) येथील घरी मध्यरात्री शिरला होता. यादरम्यान ही घटना घडली.
सैफच्या घरी मध्यरात्री नेमकं काय घडलं याबद्दल, अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीने इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना खुलासा केला आहे. “मध्यरात्री २.३० वाजता एक दरोडेखोर सैफच्या घरात शिरला, यावेळी त्यांच्या घरातील मदतनीस ( मोलकरीण ) या चोराला पाहून जोरात ओरडली. या दरोडेखोराच्या हातात चाकू होता. आरडा-ओरडा सुरू असल्याचा आवाज ऐकून सैफ बाहेर आला, आपल्या कुटुंबीयांचं संरक्षण करण्यासाठी सैफ पुढे येताच चोर आणि सैफ दोघंही आमनेसामने आले. यावेळी चोराकडे चाकू होता, त्याने अभिनेत्याने वार केले. पण, स्वत:चा बचाव करण्यासाठी सैफजवळ कोणतंही शस्त्र नव्हतं आणि तो यात जखमी झाला. यानंतर अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.” असा खुलासा सैफच्या जवळच्या व्यक्तीने केला आहे.
सैफवर हल्ला झाल्याची बातमी समोर आल्यापासून यावर आता मनोरंजन विश्वातून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. कुणाल कोहली, पूजा भट्ट यांनी ट्विट करून सैफच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.
#WATCH | Mumbai Police Crime Branch officials arrive at the Bandra residence of Actor Saif Ali Khan to investigate the attack on the actor by an intruder at his home pic.twitter.com/JetkzWMfUL
— ANI (@ANI) January 16, 2025
दरम्यान या हल्ल्यात अभिनेत्याच्या हातावर, मानेला आणि पाठीवर मोठ्या जखमा झाल्या आहेत. अद्याप यावर सैफच्या कुटुंबीयांकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.